ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान..! आधारशी पॅन लिंक केले : अकाउंट खाली तर नाही झाले ?

महाऑनलाईन सेवाकेंद्र संचालकानी २० हजार केले लंपास

चांदा ब्लास्ट

एस के महाऑनलाईन सेवाकेंद्रात विज बील न भरण्याचे विद्युत वितरण कार्यालयाबाहेर लागले सुचना फलक

ग्राहक पंचायत, भद्रावती कडे केली तक्रार

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करायला गेलेल्या गोपालचंद्र विश्वास यांच्या बँक खात्यातून तब्बल २० हजार रूपये भद्रावती येथील एस.के. मल्टिपर्पज सेवा अँड महाऑनलाईन सेवा केंद्र, भद्रावती च्या संचालकाने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती कडे प्राप्त तक्रारीनुसार गोपालचंद्र विश्वास यांनी दि. २०/११/२०२३ रोजी भद्रावती येथील एस. के. मल्टिपर्पज सेवा अँड महाऑनलाईन सेवा केंद्रात पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याकरिता गेले होते. त्यावेळेस एस. के. मल्टिपर्पज सेवा अँड महाऑनलाईन सेवा केंद्राचे संचालक यांनी गोपालचंद्र विश्वास यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते. त्यानंतर त्या घेतलेल्या अंगठ्याच्या ठस्याचा वापर करून दि. ०१/१२/२०२३ आणि दि. २१/१२/२०२३ रोजी महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांनी गोपालचंद्र विश्वास यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील बँकेच्या खात्यातून परस्पर १० – १० हजार रूपये असे एकुण २०,०००/- (विस हजार रूपये) काढले. विश्वास यांनी याबद्दल बँकेत चौकशी केली असता सदर रक्कम ही एस.के. महाऑनलाईन सेवा केंद्रातून काढल्याचे सांगितले. महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांचेकडे विश्वास यांनी विचारणा करण्यासाठी गेले असता महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांनी स्वतः ती रक्कम विस्वास यांच्या खात्यातून काढल्याची कबुली दिली. शिवाय काढलेली रक्कम लवकर देतो सांगुन त्यांना दोन महिने चक्रा मारायला लावल्या नंतर महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांनी विश्वास यांना इंडसंड बँकेचा चेक दिला. परंतु तो चेक टाकु नका मी तुम्हाला पैसे रोख रक्कम देतो असे सांगितले. परंतु चेक दिल्यानंतर एक महिना उलटुनही विश्वास यांचे पैसे परत केले नाही. त्यामुळे गोपालचंद्र विश्वास यांनी ग्राहक पंचायत भद्रावती आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर कडे लिखित तक्रार दाखल केली.

जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढणे हा खुप मोठा गुन्हा एस.के. मल्टिपर्पज सेवा अँड महाऑनलाईन सेवा केंद्राचे संचालक यांनी केला. त्यानी एक प्रकारे पैशाची चोरी केली. पैसे घेऊन विज बिल न भरण्याच्या, जीवन प्रमाणपत्र, आधार अपडेट, पॅन कार्ड लिंक करण्याकरिता महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक अंगठ्याचे ठसे घेऊन ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब करतात. अश्या अनेक तक्रारी दुरध्वनी द्वारा आल्या. यावरून महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांचे हे नेहमीचेच काम असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे ग्राहक पंचायत भद्रावती ने या प्रकरणाची दखल घेत एस. के. मल्टिपर्पज सेवा अँड महाऑनलाईन सेवाकेंद्राचे संचालक यांना विश्वास यांचे २१ हजार रूपये लवकरात लवकर परत करण्यास सांगितले आणि याची तक्रार सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे प्रवीण चीमूरकर यांचे कडे केली. प्रवीण चीमूरकर यांनी तक्रारी ची दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा समन्वयक, महा आयटी, चंद्रपूर तसेच तहसीलदार भद्रावती आणि पोलिस ठाणे, भद्रावती यांच्याकडे कारवाई करण्याचे पत्र पाठवले.

जेष्ठ नागरिकांनी आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करतांना, आधार कार्ड अद्यावत करतांना सावधानी बाळगावी. महाऑनलाईन सेवाकेंद्राकडून आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात आल्यास तात्काळ जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार, पोलिस ठाणे किंवा ग्राहक पंचायत भद्रावती कडे तक्रार दाखल करावी. विज बीलाचा भरणा बँकेतून अथवा विज वितरण कार्यालयात जाऊन करावा.

वसंत वर्हाटे,
संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये