ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हरवलेले मोबाईल अंढेरा पोलीस स्टेशनला केले परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे बायगांव येथील पुरुषोत्तम विठोबा यांचा ओपो ए77 मोबाईल फोन काही दिवसांपूर्वी हरवला होता.तसेच शेतकरी सुधाकर रामचंद्र पर्हाड रा‌.टाकरखेड वायाळ यांचा रेडीमी 11प्रो यांचे हे दोन्ही मोबाईल फोन हरवले होते.ते मोबाईल फोन सायबर क्राईमच्या मदतीने अंढेरा पोलिसांना सापडले असता ज्यांचे मोबाईल फोन हरवले त्यांना परत करण्यात आले.

यावेळी अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास पाटील यांनी अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील समस्त नागरिकानां आवाहन करत सांगितले की आपला मोबाईल फोन हरवल्यास सीईआय‌आर या पोर्टलवर जाऊन आपल्या हरवलेल्या मोबाईलची मिंसिग दाखल करायची व हरवलेल्या मोबाईल फोन मधील त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड घेऊन परत सीईआय‌आर पोर्टलवर जाऊन हरवलेल्या मोबाईल फोन चा आय‌एम‌इआय नंबर टाकायचा आहे.यानंतर संबंधित जिल्ह्याचे सायबर क्राईम टिम हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतात व हरवलेल्या मोबाईल फोन मध्ये ज्या व्यक्तीला मोबाईल सापडला त्या व्यक्तीने ज्या नंबरचे नवीन सिम कार्ड टाकले त्याचा नंबर आणि लोकेशन संबंधित सायबर क्राईम पोलिसांना मिळते.आणि यानंतर सदर पोलिस लोकेशन वरुन चौकशी करत मोबाईल परत मिळवतात व संबंधित पोलिस स्टेशनला देऊन टाकतात.

अशाच प्रकारचे दोन्ही हरवलेले मोबाईल फोन दि.२३डिंसेबर रोजी ठाणेदार विकास पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम विठोबा या.बायगांव व टाकरखेड वायाळ येथील शेतकरी सुधाकर रामचंद्र पर्हाड यांनी त्याचे मोबाईल फोन परत करण्यात आले यावेळी मेरा बु सरपंच पती लक्ष्मण वायाळ,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान,पोलिस पाटील मेरा बु,निलेश पर्हाड ग्रामपंचायत सदस्य टाकरखेड वायाळ तसेच अंढेरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी गोरख राठोड,पोहेकाॕ कैलास उगले,बिट जमदार गजानन वाघ, पञकार राधेश्याम ढाकणे, ज्ञानेश्वर म्हस्के व गणेश मुंढे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये