ताज्या घडामोडी

आयुध निर्माणी चांदा वसाहतीत धुमाकुळ घालणारा बिबट जेरबंद

रहिवाश्यांवर हल्ले करीत होता हल्ले

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

      वनपरिक्षेत्र नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आयुध निर्माणी चांदा वसाहत परिसरात धुमाकुळ घालीत असलेल्या बिबट्‌यास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

     मागील १ महिन्यापासुन चांदा आयुध निर्माणी वसाहत परिसरात बिबट धुमाकुळ घालुन रहिवाश्यांवर हल्ले करीत होता. हल्ल्यात १४ ऑक्टोबरला वसाहतीतील सानिया नितेश राखडे हिला जखमी केले. त्यामुळे तेथील रहिवाश्यांचा वनविभागावर प्रचंड रोष होता. बिबट्याला जेरबंद करावे अशी त्यांची मागणी होती. यावर आळा घालण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ कार्यालयाकडुन बिबट्याला जेरबंद करण्याची परवानगी मागविण्यात आली.

त्याकरीता बिबट्‌याला जेरबंद करण्यासाठी २ पिंजरे, ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला.अखेर १९ नोव्हेंबरला बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याची माहीती डी.एम.गेडाम यांनी पहाटे ५ वाजता वन परीक्षेत्र अधिकारी यांना दिली.घटनास्थळी जाऊन बिबट्याला पिंजऱ्यासह ताब्यात घेऊन त्यास ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

सदर मोहीम विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, पशुधनविकास अधिकारी डॉ. एस.आर.रोडे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम,वनमजूर महादेव मडावी,किशोर मडावी,पवन मांढरे, अनिल शेंद्रे,अमर किन्नाके, कैलास डोंगे,राजु वालदे, साई संस्था प्रतिनिधी अनुप येरणे, दिपक निबाळकर, शितल म्हैसकर व पीआरटी टिम यांनी मोहीम यशस्वी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये