ताज्या घडामोडी

महसुल विभागाला शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा

वहिवाट बंद केल्याने गहू पिकाचे मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
प्रमोद गिरटकर, कोरपना
कोरपणा तालुक्यातील उपरवाही येथील शेतकरी संजय साधुजी काळे  यांचे शेत भू.क्र. 53/3/ब आराजी 1-21  हे.आर या शेतात जण्यायेण्याची  सरकारी वहिवाट जेसीबी ने सरकारी जागेवर नाली खोदून काटेरी तारेचे कुंपण करून गैरर्जदार राजेंद्र रामदास लोणगाडगे यांनी बंद केली त्यामुळे संजय काळे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ह्या युवा शेतकऱ्याने या प्रकरणी कोरपणा तहसीलदारांना 30 मे 2023 रोजी लेखी तक्रार दिली होती त्याचप्रमाणे त्यांनी  पोलीस स्टेशन गडचांदूर ला देखिल संबंधित प्रकाराची तक्रार दिली. महसूल प्रशासनाने मौका चौकाशी करून वहिवाट मोकळी करून शेतात जाण्याचा रस्ता खुला केला.
मात्र शेतात कोणीही हजर नसताना गैरर्जदाराने पुन्हा एकदा सरकारी वहिवाटिच्या रस्त्यावर जेसीबीने नाली खोदून रस्ता बंद केल्याने शेतकऱ्याचे शेतात जाणे बंद केले. यासंदर्भात दुसऱ्यांदा तहसीलदार व पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असताना मंडळ अधिकारी व तलाठी मौका पंचनामा करणे व वहिवाट खुली करण्यासाठी आले असता मौका स्थळी गैरर्जदाराने राजकीय दबाव आणून शासकीय कामात अडथळा निर्माण करून रस्ता काढू दिला नाही. तुमच्याने काय होते ते करून घ्या असे अधिकाऱ्यांशी उद्धटपणे बोलुन दबाव टाकल्याने मौका चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारी जुजबी चौकशी करून परत गेले.
मागील दोन दिवसात झालेल्या सततच्या गारपीटीमुळे शेतात कापलेल्या गव्हाचा ठीग तसाच पडुन असुन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गहु मळणी करावयाचे यंत्र सामुग्री गैर अर्जदाराने रस्ता बंद केल्यामुळे शेतात येऊ शकत नाही. वेळेत मळणी न होऊ शकल्याने कापलेल्या गव्हाच्या पिकाचा ढीग पूर्णपणे खराब झाला असुन् अंदाजे पंचवीस तीस क्विंटल शेतकऱ्याचे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर नुकसान गैर अर्जदारने रस्ता बंद केल्यामुळे झाले असल्याने गैर अर्जदाराकडून झालेले संपूर्ण नुकसान भरपाई स्वखर्चाने भरून द्यावी व वारंवार तक्रार करूनसुद्धा रस्ता मोकळा करून देण्यास असमर्थ ठरलेल्या महसूल विभागाने ही रक्कम गैरअर्जदाराकडून वसूल करून द्यावी त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे जाणूनबुजून नुकसान करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्याच्यावर महसूल विभागाने फौजदारी कार्यवाही करावी व शासकीय वाहिवाट खुली करून द्यावी अशी मागणी संजय साधुजी काळे ह्यांनी लेखी स्वरूपात महसूल प्रशासनाकडे केली असून येत्या आठ दिवसात प्रशासनाने न्याय्य मागणीची दखल न घेतल्यास नाईलास्तव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा उपरवाही येथील शेतकरी संजय साधुजी काळे यांनी कोरपणा महसूल प्रशासनाला दिला आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये