ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर लोकसभा क्षेत्र वडेट्टीवार साहेब काहितरी चुकतंय का? – महेश पानसे

चांदा ब्लास्ट

     चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेसच्या उमेदवारीवरून मोठया तर्क- वितर्काला उधाण आले आहे. भा.ज.पा.चे घोषीत उमेदवार ना.सुधिरभाऊ सुद्धा कांग्रेस च्या उमेदवारीची वाट बघत असतील.कारण त्यानुसार त्यांनाही रणनिती आखावी लागणार आहे.

        पंधरवाडा संपला पण कांग्रेस उमेदवारीचा तिढा काही संपला नाही.तशी या लोकसभा क्षेत्रात शेवटच्या घटकेत ए. बी. फार्म कोण आणेल हे सांगता येत नाही.आताही नवीन असे काही होणार नाही मात्र जन अपेक्षेविरोधात उमेदवारी दिली गेली तर काहितरी चुकलय? हा सवाल उपस्थित होणार आहे व याचा अप्रत्यक्ष्य लाभ ना.सुधिरभाऊच्या पदरी पडणार आहे हे निश्चित.

         कांग्रेस अंतर्गत इथल्या उमेदवारीवरून दररोज नविन रामायण घडत आहे. सुरवातीला दिवंगत खासदार स्व.धानोरकर यांच्या पत्नी आ.प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारीसाठी मागणी रेटली.

लागलीच विरोधी पक्षनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपले नाव पुढे केले. प्रतिभा धानोरकरानी पाऊल मागे घेतले नाही. ना.विजयभाऊनी त्यांची कन्या शिवानी. वडेट्टीवार यांना उमेदवारीच्या मैदानात उतरविले.शिवाणीताईनी संपुर्ण क्षेत्रात महिलादिनाचे बैनर झडकवून आपली प्रबळ इच्छा व्यक्त केली.आ.प्रतिभा धानोरकर आपल्या पतीच्या क्षेत्रावर नैतीक अधिकारांच्या आधारावर उमेदवारीसाठी ‘स्टंट’ राहिल्या. मधात पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आ.सुभाष धोटें यांचे नाव चालविण्यात आले.

परशुराम धोटे यांच्याही नावाची हवा चालली. ‘गल्लीत चर्चा, दिल्लीत खलबतं’ सुरू झालीत. अख्खा पंधरवाडा सारे नेते आपापली महत्वाकांक्षा जपण्यात गुतले. भा.ज.पा. उमेदवार ना. मुनगंटीवारांसी मुकाबले आहे, गतकाळात मिळविलेली ही जागा कशी राखता येईल यावर चिंतन झाल्याचे चित्र बघायला मिळाले नाही.

विरोधकांनी रणनिती आखून काम सुरू केले मात्रं कांग्रेस कंपूत एकमेकांचा कार्यक्रम करण्यात वेळ खर्ची घालण्यात आला अशी कांग्रेसप्रेमींची खंत आहे.

     अजून ही उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे.विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना उमेदवारीसाठी आॉप्शन दिल्याची चर्चा आहे. सदर लिखाण संपेपर्यंत तरी उमेदवारी घोषीत झाली नाही.आ.प्रतिभा धानोरकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

         विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार कांग्रेस चे वजनदार नेते आहेत. संपुणं जिल्हयात पक्ष संघटनेवर त्यांची सध्या पकड आहे.ते निर्विवाद राजकारणी आहेत. मात्रं त्यांना लोकसभेची उमेदवारी देवून ना.मुनगंटीवार यांना किती शह देता येईल ? किंवा विजय वडेट्टीवारांनी उमेदवारी स्वतासाठी मागून घेण्यामागची नेमकी गोम काय? पक्षाने जर ही उमेदवारी दिली असेल तर यात विजयभाऊंचा फायदा काय? अशा अनेक तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.

           शेवटी राजकारण आहे,पक्षाचा निर्णय असला तरी मात्र पुणे गढ हातातून गेल्यास आ.प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीचा गेम करण्याच्या भानगडीत नेते म्हणून वडेट्टीवार साहेब आपले काहितरी चुकले?असा अंगुली निर्देश बहुसंख्य ओबिसी मतदारांकडून होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये