ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नारीपासून नारायण व्हायचे आहे सपना मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट

नवजीवन महिला योग समितीच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर, येथे महिला दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवजीवन महिला योग समितीच्या प्रमुख सपनाताई नामपल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. उद्घाटक सपनाताई मुनगंटीवार या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रेरणा कोलते, सविता कामडे, डॉ. ऋतुजा मुंदडा, मेघाताई मावळे, वर्षा कोटेकर, सारिका बुरांडे, प्रतिभा पाटील तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सपनाताई मुनगंटीवार व अन्य उपस्थित अतिथीच्या वतीने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्‍यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अरुणा शिरभैय्ये यांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत व सरस्वती स्तवन सादर केले. ह्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा तसेच उपस्थित पाहुण्‍यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्हा योग प्राणायामचे बाबतीत व सर्वच कार्यात अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात अग्रस्थानी असणाऱ्या योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांच्याप्रेरणेने कार्य करीत असून, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी विजय चंदावार यांनी ३०० योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करून उच्चांक गाठल्याने त्यांचा तसेच पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अशोक संगीडवार यांचा  सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर डॉ. ऋतुजा मुंदडा, डॉ. प्रेरणा कोलते यांनी महिला ह्या विविध क्षेत्रात काम करत असून स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्यात हिराहिरीने भाग घेत आहे असे सांगितले. सौ. सपना मुनगंटीवार यांनी उद्घाटनपर मार्गदर्शनाद्वारे नारीशक्ती बाबत सविस्तर विश्लेषण केले. प्रामुख्याने महिलांनी प्रपंच आणि परमार्थ साधण्याचा प्रयत्न करावा. महिलांमध्ये अलौकिक शक्ती जडलेली आहे. जेथे स्त्रियांच्या विचाराचा मान केला जातो, तेथे देवी-देवतांचा वास असतो. पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये औलीक शक्ती असते. स्त्रियांनी देवी-देवतांना देखील जन्म दिलेला आहे. सामाजिक कार्याबरोबरच कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शरीर आणि मन एकमेव होणे म्हणजेच योग आहे. मुलींना शक्ती दिल्या जात नाही, दुर्लक्षित केल्या जातात याचा परिणाम नकळतपणे कुटुंबावर होतो.चांगल्या गोष्टी स्वतः आचरणात आणल्यास मुलावर चांगले संस्कार घडतात, मुलांना संस्कार आणि संस्कृतीचे जतन करण्यास सांगावे. ईर्षा व स्पर्धा करू नये. गंगेप्रमाणे पवित्र राहायचे आहे. “Love and Low” ह्या दोन्ही बाबी स्त्रियांच्या अंगी असाव्यात, नारीपासून नारायण बनायचे आहे. असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर रेणुका माता ग्रुप कविता लोणावत, सरिता बुरांडे, वृंदा काळे, अरुणा शिरभैय्ये, लक्ष्मी वैरागडे, मंजुषा तपासे, नलिनी शिंदे, वैजयंती गहुकार, व अन्य महिलांनी सुंदर नृत्य सादर केले. नीलिमा साधनकर यांनी मी सिंधुताई सपकाळ बोलते यावर छोटीशी एकांकिका सादर केली.या सर्वांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनश्री मेश्राम, अरुणा शिरभय्ये शुभांगी डोंगरवार.संगीता शिंदे, संगित चव्हाण,रेखा वैरागडे, नीलिमा चरडे, अक्षता देवाडे, नीलिमा शिंदे, संगीता शिंदे, वृंदा उमरे, नीलिमा साधनकर, प्रणिती निंबाळकर, रेखा कापटे, विमल मुळे, पार्वती बुच्चे, अरुणा पाटील, कविता लूनावत व अन्य सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन महिला योग समितीच्या अध्यक्षा सौ.सपना नामपल्लीवार यांनी केले. त्यांनी या सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अतिशय यशस्वी पणे सांभाळले. वंदेमातरम् ने या कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन सिद्धी राऊत यांनी केले.

आभार प्रदर्शन वनश्री मेश्राम यांनी केले. अश्या प्रकारे अतिशय उत्साहात हा जा. महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये