ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गवरील अखेर खड्ड्याला मुहूर्त मिळाला

वाहन धारकांना अपघातापासून मुक्तता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३डी वरील नागभीड नगर परिषद हद्दीतील नवीन रेल्वे बांधकाम हद्दीतील राष्ट्रीय महामार्गांवर खड्डा पडून अनेक चार चाकी, ट्रॅक अपघात झाले त्यात दुचाकी वाहन धाराकाचे अपघात होऊन जखमी झाले मात्र तो खड्डा अपघातास कारणीभूत ठरत असून त्याकडे प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकून सामाजिक कल्यानाची जबाबदारी घेत नव्हते.

यातच आमचे प्रतिनिधी नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रताप वाघमारे यांचेशी सदर खड्ड्याविषयी चर्चा केली. यावर ताक्ताळ निर्णय घेऊन मुख्याधिकारी नगर परिषद यांना याची सूचना दिली. मुख्याधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना माहिती दिली पण त्यांनी हे काम रेल्वे हद्दीत येत असल्याने करू शकत नाही आणि रेल्वे बांधकाम ठेकेदार याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली आणि अखेर खड्डा दुरुस्त करण्यात यश आले.

यामुळे वाहन धाराकांना खड्ड्यामुळे अपघात होण्यापासून सध्यातरी मुक्तता मिळाली आहे. यामुळे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या सामाजिक कल्याण करण्याची हातोटी व प्रश्नांची उकल करून निर्णय घेतल्याने सर्वत्र अभिनंदन होतं आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये