ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इमारत खाली आणि आजू बाजूची जागा वर, लघु सिंचाई कार्यालयात साचणार पाणी

इमारत मोळकळीस, प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील लघु सिंचाई पाटबंधारे विभागाचे कार्यालय कामकाज कारण्याजोगे नसतानाही दरवर्षी तिथे पाणी साचून डबक्याचे स्वरूप येते मात्र याचं ठिकाणी मुरूम टाकून पुन्हा कार्यालयात पाणी शिरावे आणि इमारत जमीन दोस्त व्हावी असे तेथील स्थितीवरून दिसून येत आहे.

लघु शिंचन उपविभागीय कार्यालयाची इमारतिची दुरावस्था असताना नवीन इमारत बांधणे किंवा तिला नवीन ठिकाणी स्थानातरण करणे गरजेचे आहे पण तिथे मुरूम टाकून कार्यालयात पाणी घुसविण्याचे काम सुरु असल्याने आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो अशी प्रशासकीय व्यवस्था दिसून येत आहे.

याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी उप विभागीय सिंचन अधिकारी यांची भेट घेतली असता याबाबत वरिष्ठाना याची माहिती देण्यात आली आहे असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये