ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पक्ष्यांचे संवर्धन करणे आपली नैतिक जबाबदारी – कॅप्टन मोहन गुजरकर 

जागतिक चिमणी दिनानिमित्त 'प्याऊचे वाटप'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या अभावी कित्येक पक्षी मृत्यूमुखी पडतात. म्हणून त्यांच्या करीता प्रत्येकाने आपल्या घराच्या आंगणात किंवा जागा असेल तेथे एका भांड्यात पाणी व काही दाणे ठेवले पाहीजे.

आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनात पक्ष्याचे महत्वाचे स्थान असून त्यांचे संवर्धन करणे आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना पथक व इंग्लिश अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक चिमणी दिन’ कार्यक्रमात 20 मार्च रोजी केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्लिश अभ्यास मंडळाने विषयपूरक उपक्रमात ‘वकृत्व व सूत्रसंचालन कौशल्य’ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून ‘पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक तथा एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सावन वाघमारे उपस्थित होते. मंचावर विद्यार्थी प्रतिनिधी शितल नगराळे, अस्मिता दडांजे, अनुश्री खंडरे, देवीका मगरे, आकाश कन्नाके व तेजस धोटे उपस्थित होते.

या प्रसंगी वकृत्व व सूत्रसंचालन कार्यशाळेतील उत्कृष्ट स्वयंसेवकांना ‘पक्ष्यांकरीता पाणी ठेवण्याचे मातीचे भांडे’ बक्षिस म्हणून देण्यात आले.

‘वकृत्व कौशल्या’त मुलींमधून प्रतिक्षा पाटमासे, नेहा मसराम, व समिक्षा मराठे तर मुलांमधून रितेश भुजाडे, निखील मेश्राम व मयुर मांढरे तर ‘सूत्रसंचालन कौशल्या’त कोमल शितळे, अथर्व थोटे, आकाश कन्नाके व शितल नगराळे यांना ‘पक्ष्यांकरीता प्याऊ भांडे’ बक्षिस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन कोमल शितळे व नेहा मसराम यांनी तर आभार पायल चौके हिने मानले. यशस्वीतेकरीता राष्ट्रीय हरित सेना पथक व इंग्लिश अभ्यास मंडळ स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये