ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. कवडू पिपळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसींच्या तालुका कार्याध्यक्ष पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग च्या कोरपना तालुका कार्याध्यक्षपदी डॉ कवडू पिंपळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.

पिंपळकर यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या नियुक्तीमुळे कोरपना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष संघटन वाढण्यास मदत होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये