ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवकाची ट्रेन खाली येऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :- शहरातील गोकुळ नगर येथील एका युवकाने ट्रेन खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना काल १८ मार्च रोजी सायंकाळ ७.३० वाजता उघडकीस आली.
शहरातील गोकुळ नगर येथील रामप्रवेश रामलाखन जैस्वाल नामक युवकाने काल संध्याकाळी पेपरमिल च्या मागे ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली. तो डेकोरेशन मध्ये मजुरी चे काम करत होता. तसेच तो विवाहित असून त्याला दोन मुल आहेत.
आत्महत्या चे कारण समजले नसून प्राथमिक तपास पोह मारोती फुलझेले यांनी केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



