ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व.नेहा आशिष मुंधडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आले विविध सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट

दिनांक २६ सप्टेंबर २०२३ ला डॉ.गोपाल मुंधडा यांची स्व.लहान सून व ॲड.आशिष मुंधडा यांची स्व.पत्नी स्व.नेहा आशिष मुंधडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. स्व.नेहा आशिष मुंधडा यांचे जन्म २६.०९.१९८७ चे असून १७.०२.२०१६ ला ॲड.आशिष मुंधडा यांच्या सोबत विवाह संपन्न झाले. विवाहाच्या अवघ्या ०५ वर्षानंतरच २०२१ मध्ये कॉरोना काळात स्व.नेहा आजारी झाल्या आणि वयाच्या ३४ वर्षी १३.१०.२०२१ रोजी स्व.नेहा यांची देवाज्ञा झाली.

स्व.नेहा यांना बालकां प्रति विशेष स्नेह होते आणि त्यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ दादाजी बेले निवासी मतीमंद विद्यालय, सरस्वती विद्यालय मागे, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे मुंधडा परिवार तर्फे फर्निचर व अन्य सामग्री वितरण करण्यात आली आणि स्व.नेहा यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

स्व.नेहाचे स्वास्थ आणि रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती लक्षात घेऊन चंद्रपुर जिल्हा शासकीय रुग्णालय/ चंद्रपूर जिल्हा मेडिकल कॉलेज येथे कोवीड विभागात नेब्युलाइजर मशीन, स्त्री रोग विभागात बी पी इन्स्ट्रुमेंट आणि अन्य विभागात पल्स ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात आले आणि रूग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वितरण करण्यात आले.

स्व.नेहाच्या पालकांना गौवंश निमित्त विशेष आपुलकी होती हि बाब लक्षात घेऊन श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था, लोहारा येथे गौवंश साठी हिरवा चारा आणि औषधी वितरित करण्यात आली. चंद्रपूर येथील मुंधडा परिवाराचे प्रमुख डॉ.गोपाल मुंधडा यांनी आपले विचार प्रकट करतांनी अशे संबोधित केले कि, मुंधडा परिवार मधे स्व.नेहा यांची कमी कधी पूर्ण होऊ शकणार नाही. हसमुख स्वभावाची आमची सून स्व.नेहा यांची अत्यंत कमी वयात देवाज्ञा होणे हे फार दुःखद आहे.  ॲड.आशिष मुंधडा यांच्या द्वारे आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमार्फत समस्त मुंधडा परिवार व मित्र परिवार स्व.नेहा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे.

चंद्रपुर येथील वाढत्या प्रदूषणाच्या दुषप्रभावाचे परिणाम लक्षात ठेऊन ॲड.आशिष मुंधडा हे कर्करोग रुग्णांच्या सेवा आणि उपचारसाठी समर्पित आहेत आणि भविष्यात विविध उपक्रमांमार्फत कर्करोग पासून रुग्णांच्या निराकरणसाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.

या विविध सामाजिक उपक्रमात डॉ.गोपाल मुंधडा, सौ.डॉ.भारती मुंधडा,डॉ.मनीष मुंधडा,सौ.डॉ.ऋजुता मुंधडा,आर्क.घनश्याम मुंधडा,सौ.निर्मला मुंधडा,दिनेश जुमडे,धीरज देठे,अमित भारद्वाज,संजय दानेकर,अमीत राठोड,क्रांती दहिवडे,साजिद कुरेशी,जयंत निमगडे, एड.आशिष मुंधडा व मित्र परिवाराचे इतर मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये