ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीखे संस्थेने दिली प्रदर्शनातून मुलांना अभिव्यक्तीची संधी

कांसा व जेना शाळेत विद्यार्थांच्या कार्याचे प्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      सीखे इंडिया उत्सव अंतर्गत भद्रावती तालुक्यातील टीचर इनोव्हेटर कार्यक्रम ज्या जिल्हा परिषद प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळांमधून सुरू आहे. तेथे तेथे विद्यार्थिनी भाषा व गणित विषय यावर आधारित संकल्पनावर आधारित गावात प्रदर्शनी भरवून प्रत्येक मुलाला समजलेल्या संकल्पनेवर स्वतःचे मॉडेल्स किंवा तक्ते तयार करून त्याचे सादरीकरण, इतरांन पुढे, विद्यार्थ्यान पुढे, धीटपणे मांडता येणे, इतराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज कांसा व जेना शाळेत विद्यार्थांच्या कार्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

        पहिल्या सत्रात सकाळी ११ वाजता कांसा येथे व दुपार सत्रात २.०० वाजता जेना येथे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रदर्शन सिखे तर्फे घेण्यात आले. प्रदर्षना पूर्वी गावातून शिक्षण विषयी जागृती करणाऱ्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर प्रदर्शनी स्थळी प्रदर्शनासाठी आलेल्या अध्यक्ष, पाहूणे व पालकांचे स्वागत करून प्रदर्शनाचे उदघाटन लाल फित कापून करण्यात आले. कांसा येथील प्रदर्शनाचे उदघाटन शाळाव्यवस्थपन समितीचे सदस्य किशोर काळे व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल नैताम यांनी केलें तर शालिनी मत्ते, प्रणिता कुंभारे,  सुशीला रोडे, पल्लवी नैताम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रविण मांडवकर मुख्याध्यापक जेना तसेच सचिन जांभुळे तसेच आभार सशिक्षिका कू. कविता कोडपे मॅडम यांनी व्यक्त केले.

          जेना येथे कार्यक्रमाचे उद्घाटक अविनाश ढूमणे तर प्रमुख पाहूणे म्हणून अक्षय बोडे, सारिका धुर्वे, प्रतिभा काळे, जयश्री धानकी, लहुजी खरबडे हे उपस्थित होते. या वेळी सूत्र संचालन सचिन जांभुळे सर यांनी केले तर मुख्याध्यापिका कु. मेघा धैत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

        यावेळी दोन्ही शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सिखे कोच मा. संतोष वनकर सर यांनी सिखे फाउंडेशन संस्थेविषयी माहिती सांगून प्रदर्शनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रविण मांडवकर, कु. कविता कोडापे, कु. मेघा धैत व सचिन जांभुळे सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

           या प्रदर्शनातून बोलणारी मुले पाहून, मुलांचे गणित व भाषा विषयाचे मॉडेल्स, तक्ते याचे सादरीकरण पाहून पालकांनी समाधानाची भावना व्यक्त केली. सिखेचा हा एक चांगला कार्यक्रम आहे. जे मुलांना कृती करण्याची व बोलण्याची संधी देत, अशी प्रतिक्रिया पालकवर्गानी यावेळी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये