ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इकडे सेनापती सज्ज, तिकडे सेनापतीची प्रतीक्षा!

कुणालाच सोपी नसेल यंदाची चंद्रपूर लोकसभापण - महेश पानसे

चांदा ब्लास्ट

लोकसभेचे बिगुल वाजले आहेच. निवडणूक आयोगाने जिल्हासाठ १९ एप्रिल चा शुभमुहूर्त ठरवून दिल आहेच.भा.ज.पा.ने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना सेनापतीं पद बहाल करुन मैदानात सोडलेच आहे.तिकडे तिकडे मात्र काँग्रेसने कुणाला बाशिंग बांधले आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. सेनापती मैदानात उतरले नसले तरी सेना तयार असल्याचे चित्र बघायला मिळत आहेच.

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मुरलेले नेते असले व राजकिय मैदान मारण्यात तरबेज असले तरी मतदारांच्या मनात नेमका काय खल सुरू आहे याचा पुरेपूर अंदाज घेऊनच आपली रणनिती ठरविणार हे निश्चित आहे. जिल्हातील ४ विधानसभा क्षेत्रातील जातीय समिकरणे,राजकिय समिकरणे,सहकारी पक्षाच्या अपेक्षाकृत ते नक्कीच जाणून आहेत हे जरी खरे असले तरी यंदाची चंद्रपूर लोकसभा सहज मारू या भ्रमात ते राहणार नाहीत.

साऱ्या उपलब्ध साधन सुविधांचा पूरपूर वापर होणार असला तरी कठिण नाही पण सोपे ही नाही अशा स्थितीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील राजकिय गोळाबेरीज राहणार आहे हे मात्र खरे.

गत लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांनी ४५ हजारावर मतांनी हा मतदार संघ कांग्रेसकरीता खेचून आणला होता.तेव्हा भा.ज.प. चे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हे सुद्धा कच्या गुरूचे चेले नव्हतेच. मात्र मतदारांनी त्यांना पटकणी देऊन पुढे सावधान राहण्याचा संदेश दिला होताच. इथली निवडणूक नेमकी कुठल्या विषयावर मतदार रंगवतील हे रहस्य कायम असलेले दिसते. पक्षीय मतदानाच्या कितीतरी अधिक पुढे जाऊन व फंडे वापरून रण मारायचे हे उमेदवारांना समजून ध्यावे लागणार आहेच. व सारेच दिग्गज नेते यात तरबेज असल्याचे अनेकदा सिद्ध झालेही आहे.

      येत्या एक,दोन दिवसात कांग्रेसी गोटातून कुणाला ना.मुनगंटीवारांच्या पुढे उतरविले जाते हे ठरणारच आहे. हाती असलेला गड सहजासहजी जाऊ द्यायच्या मानसिकतेत कांग्रेसजन नाहीत.मात्र कडवी झुंज देण्यासाठी आम्हाला पुरूण उरणारी रणचंडीकाच दया अशी मागणी होत आहे. एवढे मात्रं खरे की कांग्रेस नेत्यानी आपल्या राजकीय सोईसाठी या क्षेत्रात उमेदवारी वरून राजकारण घडविले तर मात्र ना.सुधिरभाऊना सोपे जाईल असे अनुभवी कार्यकर्ते बोलतात.

सध्यातरी माजी खासदार कै. सुरेश धानोरकर याच्या पत्नी वरोरा विघानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी सर्व स्तरातून होत आहे हे तेवढेच खरे आहे. आ. प्रतिभा धानोरकरच का? याचे उत्तरही दिले जात आहे. महिला उमेदवार, बहुसंख्य असलेल्या ओबिसी समाजाला प्रतिनिधित्व, सिटींग आमदार, चालू लोकसभेतील दिवंगत खासदारांच्या पत्नी,राजकिय वारस, व गत वर्षभरात त्यांनी राखलेला व वाढविलेला लोकसभा क्षेत्रातील जनसंपर्क, विधानसभेत मांडलेले अनेक विषय व आरक्षण,कामगार, शिक्षण यावर केलेली चर्चा.

 राज्याचे विरोधी पक्षनेते नेते यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचेही नाव उमेदवारीसाठी सुरू आहे.मात्र या नावाचा राजकिय वलय अजून तयार झाले नसल्याची चर्चा असून ना.विजय वडेट्टीवारांनी जिल्याचे नेतेत्व आपल्याकडेच ठेवावे पण नाहक गुंता तयार करू नये असाही सल्ला दिल्या जात आहे.

मुंगटीवार विरूद्ध धानोरकर असा जर सामना रंगला तर ही निवडणूक कुणालाच सहज व सोपी राहील अशा भ्रमात कुणालाही राहता येणार नाही हेच खरे. एवढे मात्र नक्की की दोन्ही पक्षात पक्षीय बंडखोरी बऱ्याच अंशी या निवडणूकीत बघायला मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये