ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनतेप्रती कर्तव्य बजावल्याचा आनंद – हंसराज अहीर

बहुप्रतिक्षित नंदीग्राम एक्सप्रेसला अहीर यांनी दाखविली हिरवी झेंडी

चांदा ब्लास्ट

नंदीग्राम एक्सप्रेसचा बल्लारशाहपर्यंत विस्तार व्हावा ही चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांची, जनतेची सातत्याने मागणी होती. या मागणीला पुर्णत्वास आणण्यात यश मिळाल्याचे मोठे समाधान असून लोकांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नंदीग्राम एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी केले.

नंदीग्राम एक्सप्रेसचा बल्लारशाह पर्यंत विस्तार करण्याच्या प्रयत्नास माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी व राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगतानाच अहीर म्हणाले की, बल्लारशाह येथून नंदीग्राम एक्स्प्रेस सुरू करून जनतेप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडताना अत्यंत आनंद होत आहे. जनतेने मला जनसेवेकरीता प्रतिनिधित्व सोपविले आहे, जनतेप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडण्याची माझी जबाबदारी आहे असेही अहीर म्हणाले.

बल्लारशाह ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या बहुप्रतिक्षित नंदीग्राम एक्सप्रेसला दि. १६ मार्च रोजी सकाळी ०८.३० वाजता हंसराज अहीर यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेगाडीचा शुभारंभ केला.

बल्लारशाह ते मुंबईसाठी पुरेशी रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने अहीर यांनी आदिलाबादहून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह येथून सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता ही रेल्वे दररोज धावणार आहे. या रेल्वेचा लाभ चंद्रपूरचे आराध्य दैवत महाकाली देवीच्या जत्रेसाठी दरवर्षी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांना होणार आहे. तसेच बल्लारशाह, चंद्रपूर, यवतमाळ येथून नांदेड येथील प्रसिद्ध गुरुद्वाराकडे जाणाऱ्या शीख समाजबांधवांना होणार आहे त्यामुळे नंदीग्राम एक्सप्रेस सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद व्यक्त करण्यात येत आहे याबाबत प्रवाशांनी व नागरिकांनी हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले.

बल्लारपूर व चंद्रपूर येथे पार पडलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमास महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, ZRUCC सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सूंचूवार, अजय दुबे, लखनसिंह चंदेल, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रघुवीर अहीर, पुनम तिवारी, प्रशांत विघ्नेश्वर, राजु घरोटे, विनोद शेरकी, डॉ. विलास मुळे, सुशिल मुधडा, एडीआरएम रुपेश चांदेकर, एसीएम हेमंत बेअरा, उमाकांत दास व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास रेणुका दुधे, राजेंद्र अडपेवार, रवि लोणकर, गणेश गेडाम प्रदिप किरमे, प्रमोद शास्त्रकार, मोहन चौधरी, विकास खटी, राजु कागदेलवार, श्रीकांत भोयर, नामपल्लीवार सर, राजेंद्र तिवारी, बि.पी सिंह, वंदना संतोषवार, राम हरणे, सारीका संदुरकर, मयुर भोकरे, डॉ. मिलींद दाभेरे, मुन्ना इलटम, प्रशांत साळवे यांचेसह रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे सन्माननिय पदाधिकारी, नागरिक व प्रवासी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये