ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुडीयाल मोहदा ग्राम पंचायतचे उपसरपंच दत्ताभाऊ कांबळे यांचा कार्यकर्त्यांसह कॉग्रेस पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पुडीयाल मोहदा ग्रामपंचायत चे उप. सरपंच /कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ कांबळे आणि गावातील 30 ते 40 येथील नागरिक व कार्यकर्ते यांचा राजुरा विधानसभा क्षत्राचे विकासपुरुष माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे साहेब व कृषी उत्पन्न बाजार सभापती अशोक बावणे साहेब यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

माननीय आमदार साहेबांनी नुकतेच पुडीयल मोहदा गावाच्या विकास कामासाठी 30 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.उपसरपंच कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे, आमदार सुभाष धोटे यांच्या तडफदार कार्यामुळे मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये