ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपर्डा क्रिडा सामन्यात शिवरंग क्रिडा मंडळाची बाजी युवकानी मैदानी खेळात दाखविले कौशल्य 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

             माणिकगड डोंगर पायथ्याशी असलेल्या पिपर्डा या गावात जय सेवा क्रीडा मंडळाच्या वतीने रात्र कालीन तीन दिवसीय वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या मदतीकरिता सामन्याचे आयोजन करण्यात आले होते डोंगर पायथ्याशी असलेल्या पिपर्डा गावात पुणे यवतमाळ गडचिरोलीयासह ग्रामीण भागातील अनेक क्रीडा युवा मंडळांनी भाग घेतला होता.

यामध्ये गडचांदूर येथील शिव रंग क्रीडा मंडळ यांनी प्रथम पारितोषिक 20000 रुपये व सन्मान चिन्ह जय जगदंबा क्रीडा मंडळ सोनापूर यांनी द्वितीय बक्षीस15000 व सन्मान चिन्ह तर तिसरा क्रमांक रुपये दहा हजाराचे बक्षीस आदर्श युवा क्रीडा मंडळ नारंडा यांनी प्राप्त केला चौथ्या क्रमांकातील पुरस्कार दुल्हाबाबा युवा क्रीडा मंडळकुसळ यांनी प्राप्त केला गावातील सहकार्याने व युवकांच्या पुढाकारातून क्रीडा सामने पार पडले यावेळी बक्षीस वितरण श्री मारुती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आबिद अली सहसचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव मंडळाचे अध्यक्ष गोविंदा कुडमेथेसतीश मळावी प्रज्योत कोरवते विनोद तुरनकर नारायण मळावी यांचे सह सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आबिद अलीयुवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे असल्याने राज्य शासनाने केलेला क्षेत्रासाठी अनेक दालने उघडे केलेली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रामध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन अभ्यासिका व्यायामशाळा क्रीडांगण परिसर विकास यासाठी भरीव निधी शासन क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषता शिखर गाठण्याच्या कार्यामध्ये आदिवासी मुलांनी मुलींनी सहभाग घेऊन मानाचा तुरा रोवला आहेयापुढे देखील यश प्राप्त केल्याने अजून सक्रियता दाखवून अपयश आल्याने यशाचं शिखर गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे विचार व्यक्त केले.

यावेळी संचालन विलास बेंदूर यांनी केले तर प्रस्ताविक दयानंद मळावी यांनी केले तीन दिवसीय पार पडलेल्या क्रीडा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी सहभाग घेऊन खेळाचाप्रयोग आदिवासी भागात यशस्वी केला आहे या निमित्ताने गावामध्ये वीर बाबुराव शेडमाके पुतळा उभारला जात असल्याने या कार्याला शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये