Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला सुरक्षा विषयक कायदे यावर कार्यशाळा

रां म.गा.महाविद्यालयात जागतिक महिला दीन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिना निमित्त महिला तक्रार निवारण समिती तर्फे “महिला सुरक्षाविषयक कायदे” या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून अ‍ॅड.राजश्री ठाकरे उपस्थित होते.

अ‍ॅड.राजश्री ठाकरे यांनी महिला सुरक्षा विषयी कायद्यांची तसेच मुलींना आणि महिलांना त्यांच्या कायद्याविषयी योग्य मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे यांनी अध्यक्ष भाषणातून महिलांनी या कायद्या विषयी जागरूक असावे व स्वतःचा संरक्षण करण्यास समर्थ व्हावे असे विद्यार्थिनींना आणि महिला कर्मचाऱ्यांना आवाहन केले. महिला तक्रार निवारण समितीच्या संयोजिका प्रा. महानंदा भाकरे यांनी देखील महिला तक्रार निवारण समिती काय आहे? याविषयी माहिती दिली. कुमारी राजश्री बांबोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीचे कार्य आणि उद्दिष्ट स्पष्ट केले.

कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. डॉ. किरण बोरकर, महिला तक्रार निवारण समितीच्या सह समन्वयक प्रा.डॉ.रागीणी पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे संचालन पल्लवी राऊत तर आभार तक्रार निवारण समितीच्या सदस्य प्रा.स्मिता राऊत यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये