ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनाथांचा नाथ गोपीनाथ – मयुर गिते

मेंडगाव येथे गोपीनाथराव मुंडे जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमच घर करुन असलेलं राजकारणी व्यक्तीमत्व म्हणजे मा. केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आज ७४ वी जयंती तालुक्यातील मेंडगाव येथे दिमाखात पार पडली.

महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील कष्ठकरी,शेतकरी,वंचित, गरीब, दलित, दिनदुबळ्या लोकांसाठी ज्यांनी अविरत संघर्ष केला असे स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब “मरावे पण कीर्ती रुपे उरावे” काही अशीच मुंडे साहेबांची प्रेरणादायी प्रतिमा व त्यांच्या संघर्षाची जाणिव आज सुद्धा महाराष्ट्रातील सर्व जनमानसांना आहे.

मुंडे साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत साहेबांच्या विचाराचे वारसदार मयुर हरिदास गीते यांनी मेंडगाव येथे सर्वप्रकारची मोफत आरोग्य तपासणी शिबिर व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन जयंतीनिमित्त अश्या प्रकारे आपल्या सामाजिक कृतीतून आदरांजली अर्पण केली. जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांकडून गावातील २५० लोकांच्या मोफत तपासणी तसेच मोफत औषधी व समस्यांचे निवारण यावेळी करण्यात आले.या शिबिरामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मांटे, डॉ. परमेश्वर चाटे, तसेच डॉक्टर भूषण वानखेडे,डॉ.प्रसाद निकम, डॉ.वैभव शिंदे,डॉ.स्वप्निल नागरे, डॉ.सूरज काकड,डॉ.सूरज राजपूत, डॉ.सागर ठेंग अश्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. तसेच सिंदखेडराजा, देऊगावराजा,देऊळगाव मही या ठिकाणील सर्व डॉक्टर सर्व सरकारी आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा सेविका यांचा या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग होता.

या कार्यक्रम प्रसंगी गावातील अनेक जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शवली ज्यामध्ये अंढेरा पोलिस स्टेशन ठाणेदार पाटील साहेब, सरपंच भगवान कायंदे, मंडळअधिकारी रवींद्र घुगे, ग्रा.स पुष्पा घुगे,ग्रा.स नीलेश बिलगे,तंटामुक्ती अध्यक्ष रवी गीते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमामध्ये ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे पोलिस हरिदास गिते, ज्योती गिते,ज्ञानेश्वर बोडके,पवन गिते,नंदु गिते,समाधान जायभाये,बंडू गिते,सुभाष गिते, रमेश कणखर ,वसंता कणखर,कुणाल काळूसे, विजय गीते,कृष्णा जायभाये,अक्षय घुगे,नरेश गिते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक बोर्डे सर,कणखर सर,सोनूने सर यां सर्वांची मोलाची भूमिका,साथ व मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी मिळाले.

मयुर हरिदास गिते
(स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान)
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त असे उपक्रम माझ्या हातून घडत आहे हे मी माझे भाग्य समजतो. आज आम्ही २५० लोकांची सेवा करू शकलो उद्या नक्कीच २५०० किंवा त्याही पेक्षा जास्त लोकांची सेवा करू व भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करू व शालेय विद्यार्थ्यांसाठी याही पेक्षा मोठे उपक्रम राबवू असा शब्द देतो. साहेबांची शिकवण व समाजसेवेचा वारसा व साहेबांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकरत रहाणे हेच माझे ध्येय आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये