ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीघाट लिलाव रखडले,बांधकाम उदयोग कोलमडले

चांदा ब्लास्ट

जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ६५ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केलेत. सदर रेतीघाट लिलावाआधी या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिण्यात जनसुनावणी सुद्धा आटोपली. सदर ६५ घाटातील बहुमुल्य रेतीचा उपसा व वाहतुक करण्यासाठी लिलाव प्रक्रियेचा मोठा बाऊ करण्यात आला.

मात्र जवळपास अडिच ते तीन महिण्याचा कालावधी लोटूनही रेतीघाट लिलाव न झाल्याने घरकुलांना तर घरघर लागली सोबतच बांधकाम क्षेत्र मोठया प्रमाणात प्रभावित होऊन ओरड सुरू असूनही जिल्यातील सारे आमदार व जनप्रतिनिधी गप्प असल्याने यामागे नेमकी “गोम” काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान सदर घाटांचे लिलावातून जमा होणारा करोडोचा महसूल यंदा बुडतो की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. घाट लिलाव न होता सुद्धा मोठया प्रमाणात तस्करी सुरू असल्याने महसूल व पोलीस विभाग शंकेच्या घेऱ्यात आला असल्याचे चित्र संपुर्ण जिल्हयात बघावयास मिळत आहे.

               कदाचीत ‘पॉलिसी मॅटर’ म्हणून भाजपाचे २ वगळता उर्वरित ४ आमदार यावर रान उठवायला पुढे का आले नाहीत? अजून एकाही आमदार, जनप्रतिनिधीने जिल्यात बांधकाम क्षेत्राला लागलेली घरघर, हजारो घरकुल धारकांची रेतीविना होणारी गळचेपी थांबविण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. अजूनतरी रेतीघाट लिलावासाठी एकाही जनप्रतिनिधीनी यावर मागणी वा भाष्य केल्याचे न आढळल्याने रेती तस्करी मध्ये राजकिय नेत्यांचे पिलांटू तर सामील नाहीत ना? अशा चर्चा रंगलेल्या दिसतात.

           जिल्यात जवळपास साऱ्या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात रेतीघाट आहेत. मूल -सावली व ब्रह्मापुरी विधानसभा क्षेत्रातील वैनगंगा,उमानदी,अंधारी नदीपात्रातील रेती उत्कृष्ट दर्जा असलेली आहे व इथून संपूर्ण विदर्भ, व विदर्भाबाहेर. मोठी तस्करी झाल्याची बाब लपलेली नाही.जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने रेतीघाटाचे जे क्षेत्रफळ व क्वांटिटी दिली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने खोदकाम करून,रेती वाहतुक परवान्याची काळाबाजारी करून उपसा झाल्याची मोठी ओरड जिल्हयात राहीली आहे.

          चालू वर्षात रेतीघाट लिलाव झाले नसले तरी अवैद उत्खनन मोठया प्रमाणात होऊन परिसरात बेभाव विक्री सुरू असल्याने जिल्यातील हजारो घरकुल वासियांना बांधकाम करणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

बांधकाम क्षेत्रावरही याचा विपरीत परिणाम झाल्याची ओरड सुरू असूनही सारे आमदार, जनप्रतिनिधी गप्प असल्याची बोंब दिसून येते.

         घाट लिलाव झाले नसताना ब्रह्मपुरी,सावली,मूल,,सिंदेवाही, पोंभुर्णा, वरोरा ,चंद्रपूर तालुक्यात आता जे अवैध उत्खनन करणारे माफिया आहेत ते कुठल्यान कुठल्या जनप्रतिनिधिच्या दाननीला बांधले असल्याचा आरोप होत असून लवकरात लवकर रेतीघाट सुरु करण्यासाठी जिल्हयातील सर्वपक्षीय आमदारांनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त होत असताना दिसते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये