ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात जागतिक महिला दिनाचे आयोजन

महिला कर्मचाऱ्यांनी एक सुंदर असे 'वरकिंग वुमन आणि गृहिणी' या विषयावर पथनाट्य केले सादर

चांदा ब्लास्ट

महाऔष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ विद्युत केंद्र आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये एकुण २४५ महिला कर्मचारी काम करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन कर्मचारी महिला वर्गाकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटी महिला कामगारांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यात आले होते. सर्वप्रथम ०६ मार्च २०२४ ला सर्व कंत्राटी महिला कामगार यांच्या करिता सुरक्षितता आणि आरोग्याविषयी जनजागृती करिता मार्गदर्शन सत्र घेण्यात आले व तसेच मनोरंजना करिता विविध खेळ घेण्यात आले तसेच जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती. सर्व उपस्थित कंत्राटी महिला कामगारांना गिफ्ट देण्यात आले व ज्या महिला खेळामध्ये प्रथम, द्वितिय आल्या त्यांना परितोषिक देण्यात आले.
सकाळी ०७ मार्च २०२४ ला महिला कर्मचाऱ्यांकरिता कुबेर हॉस्पिटल, चंद्रपुर यांच्या तर्फे मेडीकल कॅम्प घेण्यात आला त्यामध्ये हिमोग्लोबीन, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड, शुगर, बीपी, ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या, त्यानंतर महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याकरीता विविध विषयावर सत्र घेण्यात आले. त्यात गर्भाशयाचा कर्करोग यावर डॉ. मोनिका कोतपल्लीवार यांनी, अशक्तपणा यावर डॉ. रोहन कोटकर यांनी, तर हृदयविकाराचा झटका यावर डॉ. शाम मेडा यांनी सत्र घेतले. सायंकाळी ५:३० वा सर्व महिला कर्मचाऱ्यांनी गाड्यांनी उर्जाभवन गेट ते पर्यावरण चौक रॅली काढली त्यानंतर पर्यावरण चौक येथे काही महिला कर्मचाऱ्यांनी एक सुंदर असे ‘वरकिंग वुमन आणि गृहिणी’ या विषयावर पथनाट्य सादर केले. त्यामध्ये दोघीही वेगवेगळे काम करित असेल तरी सुद्धा दोघींचेपण काम सारखेच महत्वाचे आहे हा बोध दिला.
०८ मार्च २०२४ ला स्नेहबंध सभागृह येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऑफिस तसेच साईटवर किंवा ऑपरेशन मध्ये काम करतांना येणारे अनुभव सांगितले. त्यानंतर उपमुख्य अभियंता श्री. शाम राठोड यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने साईटवर किंवा ऑपरेशन मध्ये काम करतांना महिलांना सुरक्षा व सुरक्षितता याविषयी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची ग्वाही दिली. तसेच मुख्य अभियंता श्री. गिरिश कुमरवार यांनी सुद्धा त्यासाठी दुजोरा दिला व महिला कर्मचाऱ्यांनी साईटवर किंवा ऑपरेशन मध्ये आपले जास्तीत जास्त योगदान कसे वाढवता येईल हे सुचविले.
प्रेरक वक्ता म्हणुन आलेल्या भारती नेरलवार यांनी महिलांचे टाईम मॅनेजमेंट या विषयावर एक सत्र घेतले. त्यात त्यांनी ऑफिस कामामध्ये, घरकामामध्ये आणि इतर कुठलेही काम करतांना टाईम मॅनेजमेंट कसे करता येईल हे खेळांच्या माध्यमातुन सांगितले. त्यानंतर संगितावर आधारित मेडिटेशन आणि संगीत थेरपी नृत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाला मंचावर अध्यक्षस्थानी गिरिश कुमरवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, प्रेरक वक्ता भारती नेरलवार तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता शाम राठोड, डॉ. भुषण शिंदे, प्रफुल्ल कुटेमाटे, बाहुबली डोडल, महाव्यवस्थापक (लेखा), झिनत पठाण, अधिक्षक अभियंता (एमपीडी), कुमरवार मॅडम, राठोड मॅडम उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये