ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने भजन संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील वडगाव येथे ह.भ.प. विठ्ठल डाखरे महाराज यांच्या संकल्पनेतून भजन संमेलनाचे आयोजन महाशिवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आले होते.

          या संमेलनात परिसरातील विविध गावातील महिला भजन मंडळींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे उपस्थित होते तर उद्घाटन जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर ग्रामपंचायत वडगावचे उपसरपंच सुदर्शन डवरे, त. मु. अध्यक्ष भोंगळे गुरुजी, पो.पा. कलावती मडावी, ग्रामपंचायत सदस्या संचीता मडावी, सदस्य शामकांत निखाडे, कैलाश मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शंकर पिंगे, भाऊराव उरकुडे, वासुदेव पिंपळकर, अशोक आस्कार, रागीट महाराज उपस्थित होते. भजन संमेलनात एकूण दहा भजन मंडळींनी सहभाग नोंदविला.

        कार्यक्रमाचे संचालन रामचंद्र काकडे यांनी केले. तर आभार स्वप्निल पाचभाई यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये