ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रील कंपनीचे अवैद्यरित्या मुरूम वाहतूक करणारे पाच हायवा ताब्यात

कोरपना पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट

 अवैधरित्या बेलगामपणे दिवसरात्र विना परवानगी मुरूम वाहतूक करणाऱ्या ग्रील कंपनीचे पाच हायवा कुसळ मार्गावरून शुक्रवार दिनांक ८ ला रात्रौ साडे दहा वाजता दरम्यान ताब्यात घेण्यात आले.

कोरपना पोलिसांकडून पेट्रोलिंग करीत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी चे काम असलेले ग्रील कंपनीचे हायवा अवैध रित्या मुरूम भरून कोरपना कडे घेऊन जात आहे अशी गुप्त माहिती कोरपना पोलिसांना मिळाली. लागलीच कोरपनाचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी आपल्या सह कर्मचाऱ्यासह माथा फाटा येथे जाऊन नाकाबंदी केली.

दरम्यान कुसळ रोडनी मुरूम भरलेले एका पाठोपाठ एक यु पी ७० जे टी ९०४५ , यू पी ७० जे टी ९०४६, एम एच २४ ए यू ५९३१, एम एच ३४ बी झेड ४८८०,एम एच २४ ए व्हीं १९५० क्रमांकाचे पाच हायवा येत असताना थांबविले. चालकांना रात्रौ दरम्यान वाहतूक करण्याची परवानगी आहे का याबाबत विचारणा करून कागदपत्र मागवण्यात आले. सदर चालकाकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्या अनुषंगाने कोरपनाचे तहसीलदार पी एस व्हटकर यांना माहिती देण्यात आली.तसेच कोरपना तहसील कार्यालयात सदर वाहने आणून देऊन पुढील कार्यवाही साठी ताब्यात देण्यात आले.

यापूर्वी ही ग्रील कंपनीच्या अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभाग व पोलिसांनी धडक कारवाई केली होती. त्यातच पुन्हा हा मुजोरीने प्रकार चालू असताना कोरपना पोलिसांनी ही कारवाई केल्याने ग्रील कंपनीचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये