ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालय,देऊळगाव राजा येथे जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

           डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे जागतिक महिला दिनानिमित्त समर्थ कृषी महाविद्यालयाच्या संचालिका वर्षा कायंदे, प्रा अश्विनी जाधव, प्रा ग्रीष्मा देहाने यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.

      याप्रसंगी महाविद्यालयाच्या संचालिका वर्षा कायंदे यांनी महिलांप्रती समाजाचा दृष्टिकोन तसेच महिलांनी आहे त्या परिस्थितीत मार्ग काढत सक्षम होण्याबाबत मार्गदर्शन केले तर प्रा अश्विनी जाधव यांनी सद्य परिस्थितीमध्ये महिलांचे हक्क त्यांच्यावर होणारा अत्याचार व शोषण तसेच त्यांना कशाप्रकारे सहकार्य केल्या जाईल याविषयी मार्गदर्शन केले, व प्रा विलास सातपुते यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तसेच प्रा ग्रीष्मा देहाने, प्रा शितल ढाकणे व प्रा श्वेता धांडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना आपल्या नृत्य व नाटक सादरीकरणातून मंत्रमुग्ध करून टाकले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा बनकर व दुर्गा मापारी तर उपस्थितांचे आभार ऋतुजा वाघ यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, प्रा मोहजितसिंह राजपूत, प्रा प्रणाली पाणेरकर, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा सोनाली इंगळे, सुवर्णा उमाळे, अर्चना जत्ती, कल्पना मुख्यदल, कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वीरीत्या केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये