नागपूरातील नमो युवा महासम्मेलनात चंद्रपूर जिल्हयातून हजारो युवकांची हजेरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
संतोष इंद्राळे, जिवती
नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे नमो महा मेळावा दिनांक 04 मार्च, 2024 रोजी पार पडले. भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंञी सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे मार्गदर्शनानूसार चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यातून व चंद्रपूर शहरातून हजारो युवकांनी नमो महा सम्मेलनात हजेरी लावली.
या युवा महा सम्मेलनात भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्विनी सूर्या, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, यांनी मार्गदर्शन केले. युवा संम्मेलन करीता युवकांची उपस्थिती रहावी यासाठी सर्व जबाबदारी भाजयुमो चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेश देवकते व चंद्रपूर महानगरची जबाबदारी भाजयुमो चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष विशाल निंबाळकर यांना देण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके आणि ढोलताशांच्या गजरामध्ये जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ह्यावेळी महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कांचालावर ह्यांचेसह अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.