ताज्या घडामोडी

एस टी चालक वाहकांना गणवेशावर नावाची पाटी लावणे बंधनकारक – महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश

बॅच व बिल्ला क्रमांक देखिल लावणे अनिवार्य

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

प्रवाशांना बस मधुन प्रवास करताना त्या बस वर कर्तव्य बजावत असलेल्या चालक व वाहकांचे संपुर्ण नांव, त्यांचा बॅच व बिल्ला क्रमांक माहिती व्हावा जेणेकरून संबंधित चालक अथवा वाहकाबद्दल प्रवाशांना काही तक्रार असल्यास ती तक्रार संबंधित कर्मचाऱ्याच्या थेट नावाने करणे सुलभ होईल ह्या मुख्य उद्देशाने एस टी महामंडळाने सर्व चालक तसेच वाहकांना त्यांच्या गणवेशावर कर्मचाऱ्याचे संपुर्ण नाव तसेच बॅच व बिल्ला क्रमांक लिहिलेली पट्टीका लावणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे कार्यालयीन आदेश नागपुर येथील उपमहव्यवस्थपक नियंत्रण समिती क्र. 3 ह्यांनी नागपुर विभागातील सर्व विभाग नियंत्रकांना 15 जानेवारीच्या पत्रान्वये दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार बहुतांश कर्मचारी कामगिरीवर असताना आपल्या गणवेषावर नावाची पट्टीका तसेच बॅच व बिल्ला लावणे आधीपासूनच अनिवार्य असूनदेखील चालक व वाहक पट्टीका लावत नसल्याने प्रवाशांना चालक वाहकाच्या वर्तनाविषयी आक्षेप असल्यास तक्रार देण्यास विलंब होतो त्यामुळे चालक/वाहक हे कामगिरीवर योग्य रा.प. गणवेशात (नावाच्या पाटी व बॅच बिल्ला) राहतील याबाबत सक्त लेखी सूचना देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

ह्याशिवाय चालक वाहकांची कामगिरी सुरु होण्यापुर्वी याबाबतची खातरजमा कामगिरीवरील वाहतूक नियंत्रक, वाहतूक पर्यवेक्षक यांनी करावी असे सक्त आदेश देण्यात आले असुन 1 फेब्रुवारी पासुन कामगिरीवरील कुठलेही चालक/वाहक रा.प. गणवेशात नावाची पाटी व बॅच बिल्ला विना आढळल्यास कसूर करणाऱ्या चालक वाहकासह संबंधित आगारांचे आगार व्यवस्थापक व वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये