ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसापूरात “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन.

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर -विसापूर -शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विमुक्त भटक्या समाजातील व इतर समाजाच्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ मिळावा यासाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे दि.5 मार्च, 2024 रोजी तहसीलदार, बल्लारपूर म्हणून नव्याने रुजू झालेल्या श्रीमती. प्रियदर्शीनी बोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रथमत: श्रीमती. कुळमेथे सरपंच, ग्रामपंचायत, विसापूर व सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू लांडगे यांनी मा.तहसीलदार यांचे स्वागत केले. शिबिरामध्ये श्रीमती.बोरकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री.महेंद्र फुलझेले नायब तहसिलदार यांनी सर्वांसाठी घरे शासन योजनेची माहिती दिली. कु.प्राजक्ता सोमलकर पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी अन्न व पुरवठा विभागाचे विविध योजनेची माहिती दिली. शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, जाती प्रमानपत्र व शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मेश्राम उप सरपंच, ग्रा.प.विसापूर यांनी केले.

शिबिरामध्ये कु.अनु जगताप पुरवठा निरीक्षक, श्री.सुर्वे मंडळ अधिकारी, श्री.नौकरकर तलाठी, श्री.अमोल डोंगरे कोतवाल व इतर कार्यालयीन कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये