गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी श्री. विलास नारायण चोपडे, वय ३० वर्षे, रा. देववाडी, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे मिनी बॅक व ऑनलाईन सेंन्टर नावाचे दुकाण आहे. दि. ०९.११.२०२३ रोजी फिर्यादीचे दुकाणात ०२ अनोळखी ईसम आले. त्यातील एकाने राजेश मेश्राम, रा. चंद्रपुर असे नाव सांगुन पे. टिएम. मध्ये नोकरी करतात असे सांगितले. तसेच त्यांची कंपनी फिर्यादी सारख्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्याकरीता पे.टिएम. आय.डी. देत असुन त्यातुन पैसे ट्रांन्सफर करण्याचे काम करू शकतात. त्याकरीता पे.टिएम. ५०,०००/- रू ते १,००,०००/- रू. केडीट स्वरूपात देत असतात. सदर स्किमचा फायदा घ्यायचा असल्यास मोबाईल मध्ये ०२ अप्लीकेशन इंन्स्टॉल कराव्या असे सांगुन फिर्यादीचे मोबाईल मध्ये NYE (Rapipay) व paytm अशा अप्लीकेशन इंन्स्टाल केल्या व फियादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेतले.

त्यानंतर दि. १४/११/२०२३ रोजी फिर्यादीचे बँक खात्यावर ९५,५७५/- रू. केडीट झाल्याचे दिसले. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता केडीट स्वरूपात वापरण्याकरीता आले असे सांगितले व फिर्यादींना क्यु. आर. कोड पाठवुन रक्कम पाठविण्यास पाठविण्यास सांगितल्यानंतर त्यांचे वॉलेट सुरू होईल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी क्यु.आर. कोड व आय.एम.पी.एस. चे माध्यमातुन एकुण ९५,५७५/- रू वळते केले. परंतु तरीही फिर्यादींचे पे.टिएम. वॉलेट सुरू न झाल्याने फिर्यादीने फोन करून विचारणा केली असता विचारणा केली रक्कम एका ट्रांजेक्शन मध्ये वळती न केल्याने पे.टिएम. वॉलेट सुरू झाले नाही त्यावेळी फिर्यादींना समजले त्यांचे नावे ऑनलाईन १,००,०००/- रू चे लोन घेवुन फसवणुक करण्यात आलेली आहे. अशा आशयाचे फिर्यादीचे तक्रारीवरून दि. २४. ११.२०२३ रोजी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास केला असता फिर्यादीने त्यांच्या अॅक्सीस बँक व एस.बी.आय. बँक खात्यातुन क्यु.आर. कोड व आय.एम.पी.एस. व्दारे वळती केलेली रक्कम आरोपी करण नामदेवराव चौधरी रा. नागपुर हा वापरत असलेल्या पे.टिएम. अकाउंट मध्ये व एका मित्राचे पे.टिएम. अकाउंट मध्ये वळती केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच सर्व प्रकार सुधीर हरीराम कुशवाह, रा. नागपुर यांनी दोघांनी मिळुन केल्याचे गुन्हयाचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी करण नामदेवराव चौधरी, रा. बैरागीपुरा नागपुर व सुधीर हरीराम कुशवाह, रा. प्रसाद नगर, गोधनी रेल्वे, नागपुर यांना दि. २५.११.२०२३ रोजी गुन्हयात अटक करून दि. २७.११.२०२३ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केला होता. त्यानंतर पुन्हा दि. ३०.११.२०२३ पावेतो वाढीव पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून गुन्हयात नगदी ७०,०००/- रू व वनप्लस कंपनीचे ०२ मोबाईल, ०१ रेडमी कंपनीचा मोबाईल, ०१ लाव्हा कंपनीचा मोबाईल, फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड ची झेरॉक्स प्रत, असा एकुण जु.की. १,९०,५०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. कांचन पांडे, पोलीस निरीक्षक, पो.हवा./ निलेश तेलरांधे, अनुप राऊत, रणजित जाधव, वैभव कट्टोजवार, विशाल मडावी, अनुप कावळे म.पो.शि. / लेखा राठोड, व पो.शि./प्रतिक वादीले, अंकीत जिभे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये