ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान – निधी अभावी प्रशासन हतबल

अतिवृष्टीत फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीसाठी त्वरित निधी द्या - माजी मंत्री आ.वडेट्टीवार

चांदा ब्लास्ट

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील १४ तलावे फुटली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही संबंधित विभागाकडे तलाव दुरुस्तीकरिता निधी नसल्याने प्रशासन हतबल होऊन बसले आहे. तर आगामी दिवसांमध्ये ढगफुटी किंवा अतिवृष्टी झाल्यास शेतीचे प्रचंड नुकसान जनसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत , तसेच जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेत फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, शेतकरी पुत्र, आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, शेतकरी पुत्र, आ. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या त्यात कधी अवकाळी तर कधी ढगफुटीतून अतिवृष्टी अशा विविध आसमानी संकटांपुढे विदर्भातील बळीराजांनी गुडघे टेकले आहे. मात्र सततच्या पदरी निराशा पडत असतानाही संकटात सापडलेल्या बळीराजांनी यंदाचे खरीप हंगामात उत्साहाने शेती कामाला वेग दिला. अशातच मागील आठवड्यात राज्याच्या विविध जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर व करंजी येथील तलावे फुटली. यामुळे संपूर्ण करंजी गाव , शेत शिवार, जलमय होऊन, अनेक नागरिकांची घरी क्षतीग्रस्त झाली.यात शेतकरी व जनसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आढावा घेतला असता तलाव दुरुस्ती करिता निधी नसल्याने प्रशासन हतबल असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या खनिज निधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी धुळखात असून तो अखर्चित असल्याने अनेक विकास कामे रेंगाळलेली आहे. तर विदर्भात एकूण १४ तलावे फुटली असून या तलाव दुरुस्ती करिता निधी नसल्याने प्रशासनाची हात बांधून बसण्यापलीकडे स्थिती नाही. फुटलेल्या या तलावामुळे प्रचंड प्रमाणात शेती पीके उध्वस्त झाली असून दुबार पेरणी देखील करता येत नाही. तसेच अनेक दधान उत्पादक शेतकऱ्यांचे पऱ्हे देखील वाहून गेले. अशा संकट समई शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून उणे खात्याअंतर्गत किमान पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देणे गरजेचे असताना सरकार मात्र देशाच्या अन्नदात्याच्या केविलवाण्या परिस्थितीकडे पाठ फिरवित आहे. आगामी दिवसात पुन्हा अतिवृष्टी, ढगफुटी अथवा जलसंकट निर्माण करणारी परिस्थिती ओढवल्यास लाखो,हजारो हेक्टर शेत पिके उध्वस्त होतील. शेतकऱ्यांवर असे संकट ओढावू नये याकरिता सतर्कता बाळगून फुटलेल्या तलावांकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना तातडीने  आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते शेतकरी पुत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
बॉक्स -: चंद्रपूर शहरात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक प्रभाग जलमय झाले आहे. यात ७०० ते ८०० घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले व अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर अजूनही काही प्रभागात जल संकट कायम असून पूर पीडित नागरिक, व्यवसायिक यांना तातडीने मदत पुरविणे गरजेचे चंद्रपूर शहर वासिय पूरपीडितांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे असा प्रश्न उपस्थित करीतमाजी मंत्री आ.वडेट्टीवारांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये