ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंडिया दस्तक न्युज टीव्हीतर्फे ‘विश्वरत्न विशेषांक’ प्रकाशन सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट

नागपूर : इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल चॅनेल तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने संपादित केलेल्या ‘विश्वरत्न’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच कमलाई निवास, नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांच्या उपस्थितीत पार पडला.

विश्वरत्न विशेषांक प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष निवृत्त आयएएस अधिकारी किशोर गजभिये होते तर सोबत इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे संस्थापक संपादक मुन्ना तावाडे, मुख्य संपादक सुरज पी. दहागावकर, मुख्य कार्यकारी संपादक इंजि. नरेंद्र डोंगरे, कार्यकारी संपादक दिनेश मंडपे, विदर्भ ब्युरो चीफ प्रलय म्हशाखेत्री, उपसंपादक प्रीतम गग्गुरी, चंद्रपूर जिल्हा संपादक श्याम म्हशाखेत्री, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विशाल शेंडे, चंद्रपूर शहर प्रतिनिधी सारंग चालखुरे, जिवती तालुका प्रतिनिधी बळीराम काळे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी शिवम गोरघाटे, कैलास दुर्योधन उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये