Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बचत गटांनी मुदतीत कर्जवसुली भरणा करून व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिला मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बैंक माणून ओळखली जाते. बँकेने जिल्हयातील बचत गटांना अधिक स्वावलंबी होण्याचे दृष्टीने आपल्या कर्जधोरणात लवचिकता आणून कर्जधोरण सुलभ केले असून नविन बचत गटांना २ महीण्यांत त्यांचे भागभांडवलावर ४ पट कर्ज देण्यांत येत आहे. बचत गटांना १०% व्याजदराने कर्ज देवून ३% नाबार्ड ब्याज अनुदान मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बचत गटांना ७% प्रमाणेच व्याज द्यावे लागेल. त्यामुळे बचत गटांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेउन कर्जाचा निर्धारीत मुदतीमध्ये भरणा करून नाबार्डचे ३ टक्के व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा. यामध्ये बँकेकडून महीला बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्यांत येईल असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

नाबार्डचे बचत गटांना व्याज अनुदान योजनेअंतर्गत सन २०१८ पासून नियमित कर्जवसुली भरणा करणा-या बचत गटांना ३ टक्के व्याज अनुदान मिळवून देणारी महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक असून सन २०१८ पासून मार्च २०२४ पावेतो २४०२८ बचत गटांना नाबार्ड तर्फे व्याज अनुदान रक्कम ४ कोटी ७६ लाख प्राप्त झाली असून रक्कम गटांचे खात्यात जमा करण्यांत आलेली आहे. व बचत गटांना सर्वतोपरी मदत करणारी महाराष्ट्र राज्यातील जिमस बँकेत आपली बैंक प्रथम कमांकावर

असल्याचा मान जिल्हा बँकेला प्राप्त झालेला आहे याचा जिल्हयाला सार्थ अभीमान आहे. असेही श्री. संतोषसिंह रावत यांनी सांगीतले. चंद्रपूर जिला मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्हयातील २८६३० बचत गट संलग्न असून दरवर्षी सरासरी ५००० बचत गटांना बँकेच्या ९२ शाखांमार्फत १०% व्याजदराने कर्जवाटप करण्यांत येते. मागील वर्षी २०२३-२४ मध्ये ३९६७ बचत गटांना रु. ७४ कोटी व एनआरएलएम अंतर्गत २८९१ बचत गटांना रू. ५६ कोटी याप्रमाणे एकूण ६५८८ बचत गटांना रु. १३० कोटी कर्जवाटप करण्यांत आले तसेच यावर्षी एप्रिल ते मे पर्यंत ४५६ बचत गरांना रू. १२ कोटी व एनआरएलएम अंतर्गत २५६ बचत गटांना रू. ७ कोटी याप्रमाणे एकूण ७९२ बचत गटांना रू. १९ कोटी कर्जवाटप करण्यांत आले.

बँकेतर्फे बचत गटांना जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज वाटप करण्याचा मानस असून बचत गटांनी जास्तीत जास्त कर्जउचल करावे व निर्धारीत मुदतीत कर्जाचा भरणा करून नाबार्डचे व्याज अनुदान योजने अंतर्गत ३% व्याज परतावा लाभ घ्यावा. व आपण तसेब आपल्या कुटुंबीयांचे जिवनमान उमावावे. याकरीता बैंक सदैव बचत गटांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. याबाबत काही अडचणी आल्यास बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये