ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव उत्साह साजरा

गण गण गणात बोतेच्या गजरात बालाजी नगरी दुमदुमली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री संत गजानन महाराज यांचा १४६ वा प्रकट दिन उत्सव निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर येथे आयोजित सप्ताहाची महाप्रसादाने सांगता देवेगराच्या शहरामध्ये श्री ची पालखी मिरवणूक निघाली गण गण गणात बोते त्या गजरात बालाजी नगरी यामध्ये ३१ वारकरी दिंडी सहभागी झाले होते हजारो लोकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

       श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर येथे संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च स्वतःचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताह मध्ये दररोज काकडा भजन ,श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण ,विष्णु सहस्रनाम ,ज्ञानेश्वरी पारायण ,श्रीमद् भागवत कथा ,हरिपाठ व दररोज रात्री हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते -हरिकीर्तनामध्ये हभप रमेश महाराज जायभाय ह भ प विष्णु महाराज शिरसागर ह भ प गणेश महाराज कोल्हे ह भ प मधुकर महाराज गाडेकर ह भ प गोविंद महाराज आणि काल्याचे किर्तन ह भ प संत चरणदास गुरुवर्य निकम गुरुजी महाराज यांनी केले .पंचक्रोशीतील श्री गजानन महाराज टाळकरी मंडळ सहभागी झाले होते.

      दिनांक 3 मार्च रविवार रोजी सकाळी श्री गजानन मूर्तीला महाअभिषेक करून महाआरती करण्यात आली. यानंतर पुष्पहार आणि सजवलेल्या पालखीमध्ये श्री गजानन महाराज यांची चांदीचा मुखवटा व पादुका ठेवण्यात आली देऊळगाव राजा बालाजी नगरी मध्ये श्रीची पालखी मिरवणूक निघाली यामध्ये पंचकोशीतील ३१ वारकरी दिंडी भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला .गण गण गणात बोते व टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये बालाजी नगरी भक्तीमय झाली . जागोजागीश्रीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले गजानन भक्तांनी चहापाणी आणि फराळाची व्यवस्था नगरीमध्ये केली होती.

      श्रीच्या पालखीचे मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर हभप संत चरणदास निकम गुरुजी यांचे काल्याचे किर्तन झाले यावेळेस हजारोच्या संख्येने गजानन भक्त उपस्थित होते दुपारी महाप्रसाद चा लाभ हजारो भक्तांनी घेतला .पंचक्रोशीतील सेवाभावी मंडळ यांनी महाप्रसाद वितरण करण्यासाठी विशेष सहकार्य केले .एक दिवसीय यात्रा मध्ये विविध व्यवसायिक पाळणे यांनी आपली व्यावसायिक दुकाने लावली होती.

       श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी परिसर देऊळगाव राजा यांच्या सदस्यांनी संत गजानन महाराज प्रकट दिन यात्रा महोत्सव यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये