ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘क्रोमा’ व्यापारी संकुलाच्या अतिक्रमणाला मनपाचे संरक्षण

नागरिक व इतर व्यापाऱ्यांमध्ये संतप्त भावना

चांदा ब्लास्ट

संपूर्ण चंद्रपूर शहर अतिक्रमणाच्या विळख्यात असताना मनपा प्रशासाने अनेक वर्षापासून बघ्याची भूमिका घेतली. शहरातील नागरिकांचा रोष बघून उशिरा का होईना मनपाला जाग आली व मनपाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. सहसा हातठेले व छोटे व्यापारी यांच्यावर जोर काढून मनपाची अतिक्रमण विरोधी कारवाई वर्षभरासाठी थंड बस्त्यात जाते. तसाच प्रकार यावेळी सुद्धा सुरुवातीला झाला. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील अतिक्रमण धारकांना मनपाच्या अधिकाऱ्यांनी राजरोसपणे संरक्षण दिले. काही जागरूक नागरिकांनी याचा विरोध केल्यानंतर मात्र अतिक्रमण विरोधी पथक सतर्क झाले. धडाक्यात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली.

परंतु आज 14 मे रोजी नागपूर रोडवरील ‘क्रोमा’ व्यापारी संकुला समोरील अतिक्रमण काढताना मनपाच्या अधिकाऱ्यांची पक्षपाती भूमिका पुन्हा एकदा उघडकीस आली. त्यामुळे नागरिक व छोट्या दुकानदारांमध्ये असंतोष निर्माण झाला व अचानक अतिक्रमण काढण्याची कारवाई स्थगित करावी लागली.

 दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा अतिक्रमण विरोधी पथकाला फोनवरून कॉल आल्यावर अतिक्रमण विरोधी पथकाने क्रोमा इमारतीसमोरील कारवाई अचानक थांबवून रस्त्यावर आलेल्या पायऱ्या काढण्याचे काम थांबवले. याच पायऱ्यांच्या रेषेत पुढे जाऊन भगवान ऑटोमोबाईल्स व इतर दुकानदारांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. अतिक्रमणविरोधी पथकाच्या या पक्षपाती भूमिकेमुळे इतर दुकानदार व स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. या नागरिकांनी माजी नगरसेवक देशमुख यांचेकडे मनपाच्या पक्षपाती भूमिकेबद्दल तक्रार केली. कुंदन प्लाझा चौकामध्ये पोलिसांच्या संरक्षणात छोटी दुकाने व पान टपऱ्या हटविण्याची कारवाई सुरू असताना देशमुख यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला धारेवर धरले व जाब विचारला मात्र कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून तिथेच आजची अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगित केली.

याबाबत मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना फोन वरून विचारणा केली. ‘व्यापारी संकुला समोरील गाड्यांना येण्या-जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रॅम काढण्याची कारवाई करू नये’ अशा सूचना दिल्याची माहिती आयुक्त पालीवाल यांनी मला फोन वरून दिली. मात्र ‘क्रोमा’ व्यापारी संकुला नंतर भगवान ऑटोमोबाईल तसेच इतर दुकाना समोरील रॅम व पायऱ्या काढताना अतिक्रमण विरोधी पथकाने आयुक्तांच्या सूचनांचे पालन का केले नाही ? याचे उत्तर आयुक्तांकडे नाही. यावरून आयुक्त पालीवाल दिशाभूल करीत असल्याचे सिद्ध झाले. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील व्यापारी संकुलाच्या अतिक्रमणाला मनपा आयुक्त अभय देत असल्याचा आरोप होत असुन ही गंभीर बाब आहे. अतिक्रमण काढण्याची कारवाई करताना नियमानुसार सर्वांना समान न्याय देणे अपेक्षित आहे.

    पप्पू देशमूख

माजी नगरसेवक,वडगाव प्रभाग.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये