ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीताताई चव्हाण यांची शिवसेनेचच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयाला सदिच्छा भेट

नर्मदाताई बोरेकर यांच्या हस्ते सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीताताई चव्हाण या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज दि.02 ला शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वरोरा येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देवुन चंद्रपूर जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना महिला जिल्हा संघटीका गडचिरोली छायाताई कुंभारे, माजी जिल्हा प्रमुख चंद्रपूर जिल्हा निलीमाताई शिंदे, चंद्रपूर जिल्हा संघटीका उज्वलाताई नलगे, यांचासुध्दा छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

  यावेळी त्यांना मौजा बरांज मोकासा येथे कर्नाटक एम्टा कंपनी व केपीसिएल कंपनी नियमबाह्य व बेकायदेशिर कुठलाही ताबा न घेता अवैध उत्खनन करीत असल्यामुळे व गावकऱ्यांवर अन्याय अत्याचार करीत असल्यामुळे त्यांना न्याय व हक्क मिळण्याबाबत तसेच यासंबधाने बरांज मोकासा येथील महिलांचे सुरू असणारे उपोषणाबाबत माहिती देण्यात आली त्यावर त्यांनी या संबंधाने संपुर्ण कागदपत्राची मागणी केली तसेच तेथील उपोषणग्रस्त महिलांना भेट देणार असल्याचे सांगितले तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शपर भाषणात राज्य महिला आयोगाबाबत माहिती दिली तसेच महिलांचे सक्षमीकरण व महिलांकरीता महिला आयोग काय भुमिका बजावतो यासंबंधाने सांगितले व कोणतीही मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

  यावेळी चंद्रपुर जिल्हा संघटीका, नर्मदाताई बोरेकर, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, वरोरा तालुका प्रमुख तथा संचालक कृ.उ.बा.स.वरोरा दत्ताभाऊ बोरेकर, उपतालुका प्रमुख तथा संचालक कृ.उ.बा.स.वरोरा अभिजीत पावडे, चंद्रपुर जिल्हा युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटीका सरलाताई मालोकर, वरोरा शहर संघटीका शुभांगीताई अहिरकर, उपतालुका संघटीका स्मीताताई ताटेवार, उपशहर प्रमुख अनिल सिंग, विनोद खोब्रागडे, दुर्गाताई खनके, मुक्ताताई हजारे, लताताई दाते, सुप्रभा मस्की, साक्षी दौलतकर व अनेक महिला व पुरूष पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये