देऊळगाव राजा पोलिसांची धाडसी कारवाई
बारा जुगारी पकडले सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शहराला लागून असलेल्या जाफराबाद रोडवरील एका शेतामध्ये काही आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाला मिळाली त्यावरून टाकलेल्या धाडीमध्ये घटनास्थळावरून बारा जुगारी तसेच दोन लाख बारा हजार 660 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर घटना 4 ऑक्टोबर ला सायंकाळी घडली
सविस्तर वृत्त असे की, शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या संजय नगर भागात काही जुगारी जुगार खेळत असल्याचे पोलीस सूत्रांना माहिती प्राप्त झाली त्यावर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी रेड करण्यात आले घटनास्थळावरून आरोपी देविदास दयाराम पवार राहणार संजय नगर ,मच्छिंद्र शामराव केसापुरे खडकपुरा देऊळगाव राजा , शिवाजी माणिकराव घुगे दगडवाडी,शेख अकबर शेख जहीर रहमत नगर देऊळगाव राजा, शेख अलीम शेख सलीम रहीम नगर देऊळगाव राजा, विकास काकासाहेब विधाते संजय नगर देऊळगाव राजा, गणेश बजरंग केसापुरे संजय नगर देऊळगाव राजा, प्रकाश गंगाधर सोनुने राहणार पांगरी माळी, विशाल अगंध पन्हाळे चौंडेश्वरी मंदिराजवळ देऊळगाव राजा,वैभव भगवान मोरे राहणार खडकपुरा देऊळगाव राजा,अलीम खान आलम खान संजय नगर देऊळगाव राजा, समशेर पीर खा पठाण हकीम कॉलनी देऊळगाव राजा यांना सदरील ठिकाणी पकडले त्यांच्या ताब्यातून दास पत्ते आणि इतर साहित्य नगदी रकमेसह 21 हजार 390 रकमेसह अकरा मोबाईल किंमत 85 हजार पाचशे रुपये चार मोटारसायकली किंमत एक लाख पाच हजार असा एकूण दोन लाख 12 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहेत