ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

फिर्यादीच आरोपी ठरतो तेव्हा? - महेश पानसे (विशेष)

चांदा ब्लास्ट

संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाला कौतुकाची किनार लाभली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानाला अपारदर्शक परिक्षणाचे जे गालबोट लागले हे बघता हे अभियान अशैक्षणिक होते काय? अशा बोंबा सुरू आहेत.अन्याया विरोधात नागभिड तालुक्यातील एका शाळेने तक्रार नोंदविली, मुख्य कायंपालन अधिकारी यांनी पुन्हा निरीक्षणाचे आदेश दिलेत.मात्र ज्या शाळेने न्याय मागितला त्याच शाळेवर निरीक्षण चमू जाऊन धडकली. शेवटी “जो मुर्गा चिल्लाया वही हलाल” असा तर याचा अर्थ नाही ना? सवाल कायम आहेच.

जि.प. चे मुख्य कायंपालन अधिकारी जानसन साहेबांनी या अभियानातील परिक्षणात पारदर्शकता नसल्याच्या तक़ारी आल्या या संबधाने एका शिष्टमंडळास दुजोरा सुद्धा दिला आहे हे विशेष.

पंचायत समिती स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापनाच्या शाळांचे अभियानाचे अनुषंगाने निरीक्षण करण्यात आले.नाही म्हणायला प्रत्येक तालुक्यात या शाळांची संख्या सरासरी कमीजास्त शंभरावर असेल. उपक्रमशिलता व सोबतीला इतर बाबींवर वस्तुनिष्ट परिक्षण करुन गुणानुक़म खरच दिल्या गेले असेल तर नागभिड तालुक्यातील नेवजाबाई हितकारिणी विदयालयाने दस्तुरखुद मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटून तालुक्यात वस्तुनिष्ट परिक्षण न झाल्याने अनेक उपक़मशील शाळांवर अन्याय झाल्याची तक्रार केली आहे.तशी ओरड मूल,राजूरा,ब्रह्म्पुरी,सावली,नागभिड अशा अनेक तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. शिक्षण विभागाचा रोष नको म्हणून पुढे येऊन ओरडायला शाळा तयार नसल्या तरी मात्र एका
चांगल्या शैक्षणिक अभियानाला अपारदर्शकतेचे गालबोट लागावे याचे चिंतन होणार की थातूरमातूर पूनर्परिक्षणाचा आव तेवढा आणला जाईल ? हा सवाल आहेच. ने.हि.विदयालयाने आपबितीवजा तक्रार केल्यानंतर मुख्य कायंपालन अधिकारी यांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी नागभिड यांनी समिती नेमूण याच शाळेचे प़थम परिक्षण आटोपले. अपेक्षा अशी आहे की तालुक्यात झालेले मुल्यांकन रद्द करून,वस्तुनिष्ट परिक्षण करुन गुणानुक़म देणे.इथे मात्र “जो मुर्गा चिल्लाया वही हलाल” होत असेल तर मात्र सदर सुन्दर शैक्षणिक अभियान अशैक्षणिक झाले असा आम जनतेचा
शेरा मिळाला तर मात्र..? शेवटी “बुंद से गयी वो हौद से नही आती” हे विसरून चालणार तरी कसे?

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये