Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कबड्डी खेळाचा प्रसार शहरी भागातही व्हावा : माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर

पिपरी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कबड्डी हा मैदानी खेळ असल्यामुळे या खेळाच्या माध्यमातून भरपूर व्यायाम होऊन शरीर सुदृढ व मन प्रसन्न राहते. याशिवाय या खेळाला कोणतेही साहित्य व खर्च लागत नसल्यामुळे कोणत्याही आर्थिक गटातील युवक हा खेळ खेळू शकतात. ग्रामीण भागात हा खेळ अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येते त्यामुळे या खेळाचा प्रसार मोठ्या शहरांमधूनही झाला पाहिजे असे मत भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील पिपरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने तीन दिवसीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, अण्णाजी खुटेमाटे,काँग्रेस शहराध्यक्ष सुरज गावंडे, सुनील मोरे, सरपंच अर्चना नांदे, उपसरपंच पंकज खंडाळे, विजय मडावी, कलावती कोडापे, पोलीस पाटील सुनीता ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेत तालुक्यातील सोळा संघांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेतील विजेत्या तथा उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहे.

सदर स्पर्धा मंडळाचे अध्यक्ष शेषराव कडूकर, उपाध्यक्ष प्रशांत टेकाम, सचिन नांदे व सुनील येटे यांच्या मार्गदर्शनात होत असून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी रजत आसुटकर, साहिल काकडे,पंकज कावळे, सुरज खुटेमाटे, दिनेश ढपकस, सचिन नांदे आदी सहकार्य करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये