ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ताडोबा महोत्सव दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

शहरात दि. १ ते ३ मार्च २०२४ पर्यंत ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये चांदा क्लब ग्राऊंड येथे ३ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपयोजना व नियमनासाठी, चंद्रपूर मार्गावर वाहतूक सुरळीत चालावी. वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास तसेच गैरसोय होऊ नये. याकरीता वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.

दि. १ ते ३ मार्च २०२४ पर्यंत दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाकापर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सवाकरीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदर मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

वाहतूकदारांनी या पर्यायी मार्गाचा करावा अवलंब :

सदर कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे जिल्हा स्टेडियम-मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरात प्रवेश करतील. सदर कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शनी चौक-बस स्टँड चौक-सिद्धार्थ हॉटेल-उड्डाणपूल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक- जिल्हा स्टेडियम-जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे बाहेर जातील.

या ठिकाणी असेल पार्किंग व्यवस्था : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चांदाक्लब समोरील चर्च मैदान(फक्त दुचाकी वाहनांकरिता) तसेच कृषी भवन जवळील मैदान/ट्रॅव्हल्स स्टॅन्ड या नियोजित ठिकाणी पार्क करावीत.

नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये