दिल्लीत १ ऑक्टोबरला राष्ट्रीय पेन्शन शंखनाद आंदोलन
महाराष्ट्रातील ५० हजार, चंद्रपूर जिल्ह्यातून १ हजार तर देशभरातील १० लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
देशातील शासकीय नोकऱ्यांचे झालेले खासगीकरण हटवण्यासाठी व देशात जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करण्यासाठी येत्या १ ऑक्टोबरला दिल्ली रामलीला मैदानावर राष्ट्रीय पेन्शन शंखनाद आंदोलन होणार आहे. लाखोंच्या संख्येने देशभरातील कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी एकी व आपली ताकद केंद्र शासनास दाखवून देणार आहेत. देशभरातील १० लाख कर्मचारी या आंदोलनात सामील होणार आहेत. तर महाराष्ट्रातील ५० हजार तर चंद्रपूर जिल्ह्यातून १ हजार शासकीय, निमशासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय जुनी पेन्शन चळवळ संघटनाचे अध्यक्ष विजय कुमार बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन शंखनाद आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी जय्यत तयारीत आहेत. आहेत. एकच मिशन, जुनी पेन्शन!, पुरानी पेन्शन योजना बहाल करो!, शासकीय नोकरीचे खासगीकरण हटवा!चे बॅनरही करण्यात आले. देशातील पोस्ट, महसूल, वन, कृषी, ग्राम, शिक्षण, पाटबंधारे, आरोग्य, सुरक्षा, बँकिंग, मंत्रालयीन क्षेत्रातील कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी वोट फॉर ओपीस मोहिमेच्या राबविण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. देशभरात होत असलेले शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व शेअर्स बाजारावर आधारित असलेली नवीन पेन्शन योजना हटवून पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना बहाल करणे व शासकीय योजनांचे खासगीकरण थांबवणे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2023 च्या पेन्शन शंखनाद रॅली ची दखल घेऊन जुनी पेन्शन लागू करावी. अन्यथा 2024 च्या निवडणुकीत देशभरात आम्ही VoteforOPS ची मोहीम राबवू.
विपीन धाबेकर
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर
जुनी पेन्शन ही कर्मचारी यांची निवृत्तीनंतरचे जीवन जगण्याचा आधार आहे. करिता सरकारने जुनी पेन्शन लागू करावी. अन्यथा जो पेन्शन बहाल करेगा. वो ही देश पे राज करेगा. ही मोहीम आम्ही राबवू.
लखन साखरे
जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर