ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे नविन वाहनांचे हस्तांतरण

जप्त मुद्देमाल परत करणे व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा नियोजन वार्षिक योजनांतर्गत प्राप्त नविन वाहनांचा हस्तांतरण सोहळा, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्याचा कार्यक्रम तसेच परिसर वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा) उपस्थित होते.याप्रसंगी मा. श्री. सुधीर पांगुळ नगराध्यक्ष, नगर परिषद, वर्धा, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल भा.पो.से. पोलीस अधीक्षक, वर्धा व श्री. सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांची उपस्थिती होती.

जिल्हा नियोजन वार्षिक योजनेअंतर्गत वर्धा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचे डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे हस्तांतरण करण्यात आले.

पोलीस ठाणे स्तरावर दाखल विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला.

१ वर्धा शहर अप.क्र. २४३/२०१८, कलम ४५७, ३८० भांदवि , सोन्याचा तुकडा (११० ग्रॅम) व चांदीच्या ४ तोरड्या (३६ ग्रॅम) ३,३१,४६४/- अमोल गोपालराव भय्या, वय ४२ वर्ष, रा. भामटीपुरा, वर्धा

२ वर्धा शहर अप.क्र. १२२१/२०१६, कलम ४५७, ३८०, ३४ भांदवि चांदीच्या तोरड्या (२१.६०० ग्रॅम) ५००/- सुधिर विठ्ठलराव पाते, रा. भिमनगर, सावंगी मेघे, वर्धा

३ वर्धा शहर अप.क्र. १८६/२०११, कलम ४५७, ३८० भांदवि सोन्याची साखळी (४० ग्रॅम) | १,००,०००/- प्रशांत सुरेंद्र सराफ, वय ४५ वर्ष, रा. टेलिकॉम नगर, वर्धा

४वर्धा शहर अप.क्र. २७६/२०१४ सोन्याचा रवा/लगडी (६ ग्रॅम) व चांदीची कांडी (२१० ग्रॅम) | २३,१००/- सौ. कांता विनायक मुंजेवार, रा. मारोती समाधीजवळ, जुनी म्हाडा कॉलनी, वर्धा

५ देवळी अप.क्र. १०१८/२०२३, कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ भांदवि | स्टेट बँक देवळी येथे जमा रक्कम ४,००,०००/- बळवंत गोविंदराव मधुरे, वय ७२ वर्ष, रा. खटेश्वर मंदिर, देवळी

६ देवळी अप.क्र. ९४/२०२५, कलम ३१८(४), २०४, ३(५) बीएनएस स्टेट बँक देवळी येथे जमा रक्कम ३०,०००/- लक्ष्मण आनंदराव डुकरे, रा. डिगडोह, ता. देवळी, जि. वर्धा

७ देवळी अप.क्र. ४३/२०२६, कलम ३३१(३)(४), ३०५ बीएनएस एक जुना वापरता लॅपटॉप (डेल) २०,०००/- कविता रामदासजी झाडे, वय ४७ वर्ष, रा. सालोड, ह.मु. महालक्ष्मी टाऊन, देवळी

८आर्वी अप.क्र. १०६६/२०२५, कलम ३०३(२) बीएनएस पिवळ्या धातूचे मणी गुंफलेली मणी व पिवळ्या धातूची नथ ३६,६५०/- सौ. काजळ पंकज भुरे, रा. आंबेडकर वार्ड, आर्वी, जि. वर्धा

९ कारंजा घा. अप.क्र. ३४७/२०२६, कलम ३३१(४), ३०५ बीएनएस | सोन्याचे मंगळसूत्र जाममध्ये ४४ मणी (४ ग्रॅम) व २ सोन्याचे डोरले (४ ग्रॅम) ८०,०००/- सौ. मनीषा मनोहर चोपडे, वय ३७ वर्ष, रा. नागाझरी, ता. कारंजा घा., जि. वर्धा

१० गिरड अप.क्र. ६९/२०२६, कलम ३०५(अ) बीएनएस | पिवळ्या धातूचे गहूमणी, १९ नग चापट पट्टी (२.९२० ग्रॅम) व पिवळ्या धातूचे नेकलेस डिझाईनचे कानातील टॉप्स (४.०२० ग्रॅम) | ८०,०००/- अर्चना नरेश बहादुरे, रा. पवनगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा |

११ गिरड अप.क्र. १२६/२०२६, कलम ३०३(२), ३(५) बीएनएस एक गरसोळी, काळे काचेचे मणी व पिवळ्या धातूचे २६ नग नटीव्ह मणी व डोरले (एकूण वजन ५.६८० ग्रॅम) | ३०,०००/- राजू धारणे, रा. खापरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

१२ देवळी अप.क्र. ८१४/२०२६, कलम ३३१(३)(४), ३०५(अ) बीएनएस एक जुना वापरता लॅपटॉप (बिस्टो ३५५८ टॅग) | २०,०००/- कविता रामदासजी झाडे, वय ४७ वर्ष, रा. सालोड, ह.मु. महालक्ष्मी टाऊन, देवळी. वृक्षारोपण कार्यक्रम:

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये