ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

100 अपात्र शिधापत्रिका धारक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणार कार्यवाही – तहसीलदार पानमंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून संपूर्ण राज्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याकरता वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणाली मधील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या डेटाबेस अन्न पुरवठा विभागाच्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सोबत पडताळण्यात आला आहे.त्यानुसार जे शासकीय अधिकारी, कर्मचारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभ घेत आहेत त्यांची यादी शासनाकडून राज्यातील सर्व तालुक्यांना पुरवण्यात आलेली आहे.

त्यानुसार सिंदेवाही तालुक्यातील एकूण शंभर अपात्र शिधापत्रिका धारकांना शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंदेवाही चे तहसीलदार संदीप पानमंद तसेच शरद लोखंडे निरीक्षण अधिकारी सिंदेवाही यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये