गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध पेट्रोल-डिझेल विक्री वाहतूक करणारी टोळी गजाआड

पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २१.०२.२०२४ रोजी पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांना मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीवरून त्यावरून पो.स्टे. सावंगी ठाणेदार संदिप कापडे, सहा. पोलीस निरीक्षक हे तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले. यातील आरोपी शेख इश्ताक रा. विकास चौक, सेलू याचे राजकमल ढाबा अॅन्ड रेस्टॉरेंट मध्ये आरोपी १) सैयद रिजवान सैयद महमूद अली, वय ३८ वर्ष, रा. खडकी (आमगाव) २) अमजद खान आरीफ खान, वय ४१ वर्ष, रा. विकास चौक, सेलू ३) ज्ञानेश्वर हरीभाऊ चनकापुरे, वय ६० वर्ष, रा. सिरसगाव मोझरी जि. अमरावती यांचे मदतीने पेट्रोल व डिझेल ची अवैधरि वाहतूक व विक्री कमी दराने पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ आहे असे माहिती असुन सुध्दा निष्काळजीपणाने अवैधरित्या टाटा झेनान पावर कंपनीची चारचाकी क्रमांक एमएच ०३ सीपी ४५८९ मध्ये ग्राहकांना विक्री करीता जवळ बाळगून तसेच विना परवाना देशी दारू बाळगून मिळून आल्याने नमुद आरोपी विरूध्द पो.स्टे. सावंगी (मेघे) येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

आरोपीतांचे ताब्यातून १) टाटा झेनान क्रमांक एमएच ०३ सीपी ४५८९ किंमत ३,५०,०००/- रू २) ५० लिटर पेट्रोल किंमत ५३५०/- रू ३) ३० लिटर डिझेल २८२०/- रू ४) खाली डबक्या किंमत २०००/- रू ५) दोन मोबाईल किंमत १७०००/- रू ६) देशी दारू किंमत १५००/- रू ७) नगदी १८६७०/- रू असा एकूण जुमला किंमत ३,९७,३४०/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक संदिप कापडे, ठाणेदार पो.स्टे. सावंगी (मेघे) यांचेसह चांद नबी, जावेद शेख, निलेश शडमाके, अनिल वैद्य, अमोल जाधव, निखील फुटाणे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये