ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आचार्य विद्यासागरजी महाराज समधिस्त – जैन धर्मीय शोक सागरात

शिष्यवृत्ती व तपस्यांसाठी होते परिचित - वयाच्या 78 व्या वर्षी घेतली समाधी

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

जैन धर्मीयांच्या अत्यंत श्रद्धेय तसेच शिष्यवृत्ती व तपस्यांसाठी चिरपरिचित आचार्य विद्यासागरजी महाराज साहेबांनी वयाच्या 78 व्या वर्षी समाधी घेऊन आपल्या जीवनप्रवासातून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी डोंगरगड येथे निवृत्ती घेऊन ते भगवान महावीर चरणी लिन झाले.

आचार्य विद्यासागरजी महाराज ह्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 रोजी कर्नाटक राज्यातील सदलगा येथे झाला. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. त्यांनी आपल्या प्रवचनातून भगवान महावीर ह्यांचा संदेश जगभरात पोचविला, त्याचप्रमाणे त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. मध्यरात्री २.३५ वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले.

आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या समाधीची माहिती कळताच समस्त जैन समाज शोकसागरात बुडाला असुन चंद्रप्रभु जैन मंदिर तुकुम चंद्रपूरचे अध्यक्ष महावीर सोइतकर ह्यांनी आयोजित केलेल्या विनयांजली सभेचे आयोजन केले होते. चंद्रपूर येथील जैन समाजातील नागरिकांनी ह्या दुखःद क्षणी एकत्र येऊन सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेशबाबु पुगलिया ह्यांच्या नेतृत्वात एकत्रित होऊन आचार्य विद्यासागर महाराजांच्या स्मृतींना उजाळा दिला.

ह्यावेळी स्थानकवासी जैन समाजाचे अध्यक्ष योगेश भंडारी, दिगंबर मूर्तिपूजक संघाचे सचिव राजेश डागा, पी के जैन, मित्थनलाल जैन, श्रीमती भगवतकर ह्यांनी आपले हृदय मनोगत व्यक्त करून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. विनायांजली सभेचे संचालन मनोज पोद्दार ह्यांनी केले.

ह्यावेळी गुलाब खंडाळे, रवींद्र बैद, सुधीर बाठीया, दीपक पारख, सुरेंद्र खजांजी, प्रसन्न बोथरा, सत्यपाल जैन पंकज जैन, नवीन चोरडिया, विशाल मुथा, हरीश मुथा, प्रवीण गोठी, राजेश जैन, शितल सुराणा, डॉ. सावलीकर, शरद राजने, ॲड. रवींद्र सावलकर, सुधाकर कस्तुरे, देवेंद्र सुराना, श्यामबाबु पुगलीया, प्रशांत बंड, भागवतकर, ॲड. भुसारीजी ह्यंचेसह समाजातील गणमान्य व्यक्ती व महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये