ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

       दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

     यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने उपजिल्हा रुग्णालयाचे सहा. अधीक्षक गणेश तुमराम, समुपदेशक गोविंद कुंभारे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

    सुरूवातीला डॉ. प्रफुल खुजे राजेंद्र मर्दाने, गोविंद कुंभारे, गणेश तुमराम व प्रमुख मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

     कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक ओंकार मडावी, सुरेखा बगमारे, देवराज जुलमे, बंडू पेटकर, विक्की आत्राम, नीता वाघमारे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये