ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंती वेशभूषा स्पर्धेत लोकमान्य टिळक विद्यालयाचे सुयश..

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धेत स्थानिक लोकमान्य टिळक विद्यालयाच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत जिजाऊंच्या वेशभूषेसाठी वर्ग आठवा अ ची विद्यार्थिनी कु. कृतिका भोयर व मावळ्याच्या वेशभूषेसाठी वर्ग पाचवीचा विद्यार्थी श्लोक चांदेकर यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आणि सायकल देण्यात आली. तसेच वर्ग नऊ ते दहा गटातील हिमांशू गहूकर, कु.श्रेया सातपुते, सागर गोयल, सुफियाना शेख आणि वर्ग एक ते आठ गटातील सुशांत पिंपळकर, कु. अरमीन कुरेशी,रुद्र लिपटे या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.

त्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ॲड. रवींद्रजी भागवत, उपाध्यक्ष श्री.ॲड.प्रशांतजी घट्टूवार, सचिव श्री. गांगेयजी सराफ तसेच मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर, पर्यवेक्षक श्री. जहागीरदार सर,पर्यवेक्षिका देगमवार मॅडम आणि शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये