गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाची प्रो रेड

संपूर्ण विदेशी दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक वर्धा यांनी स्टेशन फैल वर्धा शहरात दोन प्रो रेड करुन एक मारुती कार किंमत 6,00,000/-रुपये ओसी प्तेन व्हिस्की 144 बाॅटल किंमत 36,000/-रुपये ओसी ब्लू व्हिस्की 120 बाॅटल किंमत 36,000/- रुपये राॅयल स्टाॅग कंपनीच्या 144 बाॅटल किंमत 50,000/-रुपये टुबर्ग कंपनीच्या 24 कॅन किंमत 12,000/-रुपये एक सुझुकी ऐकक्सस मोपेड गाडी किंमत 1,00,000/- रुपये देशी दारू 100 बाॅटल किंमत 10,000/-रुपये व ऑयफोन कंपनीच्या मोबाईल फोन किंमत 1,00,000/- रुपये एकून जुमला किंमत 9,44,000/- रुपये आरोपी नामे अविनाश सुरेश यादव वय 31 वर्षे राहणार ‌सांवगी मेघे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसरी कारवाई आरोपी नामे जय नासरे राहणार स्टेशन फैल वर्धा याच्या घरी प्रोरेड करून 1,06,000/- रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला असून आरोपी जवळून ओसी प्तेन कंपनीच्या 24 बाॅटल किंमत 6,000/- रुपये व एक सुझुकी बर्गमन कंपनीची मोपेड वाहन किंमत 1,06,000/- रुपये असा एकूण मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.

आरोपी गुन्हा नोंद करून आरोपीला न्यायालयात पाठविण्यात आले आहे हि कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर पोलिस हवालदार रोशन निंबोळकर नायक पोलिस अंमलदार सागर भोसले पोलिस अंमलदार अभिजित गांवडे कैलास वालदे प्रदिप कूचनकर संदिप गांवडे व सर्व स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक वर्धा यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये