ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

चांदा ब्लास्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबगाव (मक्ता) च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा व सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या स्पर्धा वर्ग पहिली ते चौथी असा प्राथमिक गट व पाचवी ते सातवी असा माध्यमिक गट अश्या दोन गटांमध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून स्पर्धांना भर भरून प्रतिसाद मिळाला. तर प्राथमिक गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी उज्वल उराडे, कनिष्का तावाडे, रिंकू अत्राम हे ठरले आणि माध्यमिक गटात सलोनी बुरांडे, रिद्धी वैरागडे, धनश्री झाडे, व शर्वरी वैरागडे या प्रथम क्रमांक मिळवला. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ही वर्ग पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आली असून या स्पर्धेत आर्या बुरांडे हिने प्रथम तर क्रिश पोवरकार याने द्वितीय क्रमांकाची सूनिश्र्चीती केली.

प्रसंगी दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ला सकाळी ठीक 10 वाजता प्रस्तुत स्पर्धांच्या विजेत्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमात सौ. निर्मला किरमे (सरपंच दाबगाव) विद्या बुरांडे (ग्रा. प. सदस्या), रुपाली उराडे, रजनी मेंढे (आशा वर्कर), प्रतिभा तावाडे, कु. दीक्षा उराडे, कुणाल वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन – नियोजन व सूत्र संचालन कु. दामिनी रवींद्र बुरांडे (व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ती) यांनी केले तर आभार प्रदर्शन दुशांत बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिथुन सातपुते (सैनिक भारतीय आर्मी), इंद्रजित गव्हारे (सैनिक भारतीय आर्मी), रमित बारसागडे (अग्निविर सैनिक भारतीय आर्मी) व कु. स्वाती कस्तुरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये