ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक 19 फेब्रुवारी “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र शासनाच्या जयंती परिपत्रकानुसार साजरी करण्यात आली.याप्रसंगी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री धर्मराज रामकृष्ण काळे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री महेंद्र ताकसांडे, कला, विज्ञान विभाग प्रमुख श्री प्रशांत खैरे,तसेच ज्योती चटप उपस्थित होत्या,

प्रमुख अतिथींनी शिवाजी महाराजांचा इतिहास व इतिहासातील अनेक प्रसंग आपल्या मनोगतुन व्यक्त करताना महाराजांचा खरा इतिहास समजून घेण्याची व अंगीकारण्याची गरज व्यक्त केली सुशिक्षितांनी हा इतिहास गाव खेड्यांपर्यंत पोहोचवून शिवाजी महाराजांच्या कार्याला पूर्णत्वास कसे नेता येतील या दृष्टिकोनातून समाज प्रबोधन करावे असाही आशावाद व्यक्त केला. सर्व विद्यालयीन,कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री खैरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री जहीर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये