ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्र सरकार कडूनही विदर्भावर अन्यायाची मालिका सुरूच

केंद्राने मंजूर केलेल्या ३२ हजार कोटी रुपयाच्या ७ रेल्वेमार्गातून विदर्भ गायब

चांदा ब्लास्ट

केंद्र सरकार ने देशात नुकत्याच ३२ हजार कोटीच्या नवीन ७ रेल्वे मार्गाला मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून दिला आहे. सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असलेल्या नक्षलवादाला आळा घालण्या करता, खनिज संपत्ती वर आधारित उद्योग येऊन बेरोजगारांना नौकरीची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खनिजाचे कोठार असणाऱ्या भागाशी (सुरजागड) या रेल्वे मार्गाची गेल्या १२ वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगवेगळ्या पातळी वरून व आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी सातत्याने केंद्र सरकार कडे रेटून धरत असतानाही केंद्राने याकडे दुर्लक्ष करून विदर्भावर अन्यायाची मालिका सुरूच ठेवली आहे. या विदर्भविरोधी भूमिकेचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने तीव्र निषेध केला आहे. 

                 शेतमाल व इतर वस्तूंच्या बाजारपेठा असलेल्या विदर्भातील खामगाव व मराठवाड्यातील जालना या व्यापार वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या खामगाव – जालना रेल्वे मार्गाकडेही केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. दुर्दैवाने रेल्वे राज्यमंत्री मा. ना. रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील असूनही “वैद्याचं पोरं किरमाने मरते” असाही अनुभव विदर्भ व मराठवाड्यातील जनतेला उघड दिसून आला आहे. तसेच उद्योगाचा अभाव असणाऱ्या बडनेरा-कारंजा- मंगरूळपीर – वाशीम या जिल्हा मुख्यालयात उद्योग आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या याही रेल्वे मार्गास या प्रस्तावात स्थान दिसून येत नाही. कोळसा – सिमेंट व लाकूड या उत्पादनांची रेल्वे द्वारे थेट वाहतूक होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विदर्भ – तेलंगणा भागाशी जोडणाऱ्या माणिकगड – राजुरा – गडचांदूर – कोरपना – आदिलाबाद या नक्षलग्रस्त भागाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाकडेही या प्रस्तावात दुर्लक्ष केले गेले आहे. यावरून विदर्भातील पुढारी केंद्र सरकार मध्ये असतानाही केंद्र सरकार कडून विदर्भावर अन्यायाची मालिका सुरूच आहे.

ही बाब दुर्दैवी असून याचा विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, महिला अध्यक्ष रंजना मामर्डे, जेष्ठ नेते श्रीनिवास खांदेवाले, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, ऍड. सुरेश वानखेडे, कैलास फाटे, तेजराव मुंडे, गजाननराव भोयर, ओमप्रकाश तापडिया, डॉ. विठ्ठल घाडगे, सुरेश जोगळे, शंकरराव कवर, सतीश देशमुख, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, प्रकाश लध्दा, सरला सपकाळ, मधुसूदन हरणे, पदमाकर भांदक्कर, सचिन डाफे, किशोर दहेकर, कपिल ईद्दे, मितीन भागवत, राजेंद्रसिंग ठाकूर, अरुण मुणघाटे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, कृष्णराव भोंगळे, सुरेंद्र कोदगीरवार, सुनील गुद्धटवार, सुधा पावडे, रेखा निमजे, सुनीता येरणे, ज्योती खांडेकर, डॉ. रमेश गजबे, प्रभाकर कोंडबत्तूनवार, विष्णुपंत आष्टीकर, नरेश निमजे, दिनेश काळे, मनीषा फुंडे, सुरेंद्र वाढई, दादाराव फुंडे, अतुल सतदेवे, वसंतराव गवळी, हिरालाल खोब्रागडे, प्रकाश पचारे, सुदाम राठोड, अंकुश वाघमारे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये