ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकपूर्णा प्रकल्पात अवैध वाळू उत्खनन सुरु

महसूल विभागाने केली कारवाई ; लाखो रुपयांचे साहित्य केले जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असताना महसूल विभागाच्या पथकाने 13 फेब्रुवारी ला धाड टाकून कारवाई केली. यात लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाई मुळे परिसरातील रेती माफिया चे धाबे दणाणले आहेत

तालुक्यातील विविध नदी पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,नायब तहसिलदार आस्मा मुजावर,सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या व्यक्ती वर 8 फेब्रुवारी पासून कारवाई सुरू केली आहे, पहिल्या दिवशी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी एक बोट,फायबर, सक्शन पाईप जोडणी केलेले 100 फूट चे 3 नग जप्त केले.

12 फेब्रुवारी ला 1 बोट,फायबर, इंजिन ,जोडणी केलेले सक्शन पाईप,जप्त केले. 13 फेब्रुवारी ला1 बोट, फायबर,जोडणी केलेले सक्शन पाईप,असे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले.

यंत्रणेद्वारे अवैध वाळू उत्खनन होत असल्याने हे साहित्य एन डी आर एफच्या पथकाने जागेवर नष्ट केले आहे,अवैध उत्खननात रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये